• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आठ दिवसात 140 कोटीच्या धाराशिव शहरातील रस्ते कामाची फेरनिविदा काढू…पालकमंत्री सरनाईक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 17, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS


आठ दिवसात 140 कोटीच्या रस्ते कामाची फेरनिविदा काढू; पालकमंत्री सरनाईक यांची भूमिका


महाविकास आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल

धाराशिव दि. 17 : धाराशिव शहरातील नगरोत्थान महाअभियानातील 140 कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पातील अडथळ्यांवर अखेर हालचालीला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना आठ दिवसात फेरनिविदा काढून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून निवेदन दिल्यावर माध्यमाशी बोलताना त्यांनी असे आदेश दिले.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि मकरंद राजेनिंबाळकर उपस्थित होते.

महाविकास आघाडीकडून दिलेल्या निवेदनात म्हटले की, नगरोत्थान योजनेअंतर्गत 140 कोटी रुपयांचा निधी 23 फेब्रुवारी 2024 रोजी मंजूर होऊनही रस्ते कामास सुरुवात झाली नाही. नियमाप्रमाणे सात दिवसांत निविदा काढून तीन महिन्यांत काम सुरू होणं अपेक्षित होते. परंतु 8 ते 28 मार्च 2024 पर्यंतची मुदत असूनही निविदा उघडली गेली नाही. सहा जानेवारी 2025 रोजी महाविकास आघाडीने रास्ता रोको आंदोलन केले. नंतर नगरपरिषदेकडून फेब्रुवारी अखेर काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाले. 25 जानेवारी 2025 रोजी निविदा उघडली गेली, मात्र कंत्राटदाराने अंदाजपत्रकापेक्षा 15 टक्के जादा दराची मागणी केली.
नगरपालिकेने आश्वासन देऊनही काम सुरू न झाल्याने 28 एप्रिल 2025 रोजी महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. यावेळी पालकमंत्री सरनाईक यांनी 30 एप्रिल रोजी उपोषणस्थळी भेट देऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. पण दोन मे रोजी फेरनिविदेचे पत्र नगरपरिषदेला मिळूनही 12 जून 2025 रोजी निविदा रद्द झाल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. तीन महिने उलटले तरी कोणताही निर्णय झाला नव्हता.
या प्रदीर्घ विलंबामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून सर्वत्र खड्ड्यांमुळे नागरिक, महिला, मुले आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरील सहा महिन्यांपासूनची स्थगिती तातडीने उठवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. महाआघाडीने इशारा दिला होता की, रस्ते प्रकल्प तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सरनाईक यांनी पंधरा दिवसात फेरनिविदा काढून काम सुरू करण्याचे स्पष्ट आदेश देत कामाला गती देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
यावेळी प्रशांत पाटील,प्रवीण कोकाटे, रवि वाघमारे,अग्निवेश शिंदे,सोमनाथ गुरव,आयाज शेख,उमेश राजेनिंबाळकर,राजाभाऊ पवार,सिद्धार्थ बनसोडे,राणा बनसोडे, धनंजय राऊत,बिलाल कुरेशी,सतीश लोंढे, संदीप शिंदे, संभाजी दळवी, सत्यजित पडवळ, अशोक पेठे, संजय गजधने,हर्षद ठवरे,सह्याद्री राजेनिंबाळकर,अक्षय जोगदंड,अजिंक्य राजेनिंबाळकर त्यांचे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शहरातील नागरिक उपस्थित होते

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectorosmanabad cityउस्मानाबादकार्यालयजिल्हाधिकारीधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकविकास निधीस्थगिती
Previous Post

स्त्री रुग्णालयाला वाढीव जागा द्या – शहर काँग्रेसची पालकमंत्र्याकडे मागणी

Next Post

धाराशिव प्रशालेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण 

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

धाराशिव प्रशालेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!