दुष्काळी परिस्थितीचे भान राखत डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल
शक्तिप्रदर्शन आणि गाजावाजा टाळत पदवीधर, युवक, विद्यार्थी, शिक्षक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार; महाविकास आघाडीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी
मराठवाडा | लोकविचार
मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे भान राखत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी अत्यंत साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तिप्रदर्शन किंवा गाजावाजा न करता, पदवीधर, युवक, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्याकडून डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील संकट लक्षात घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करताना साधेपणाला प्राधान्य देत उमेदवारी अर्ज दाखल केला.
हा केवळ उमेदवारी अर्ज नसून मराठवाड्यातील पदवीधर, युवक, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याच्या भूमिकेची सुरुवात असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. पदवीधरांच्या समस्या, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य, शिक्षकांच्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री फौजिया खान, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, खासदार जगन्नाथ काळे, मोतीवाला, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पदवीधर निवडणूक प्रमुख नरेंद्र काळे, प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीहंबीरे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, जिल्हाध्यक्ष संजय काळबांडे, मुस्ताक अहमद, राजेश पवार, आशिष पवार आणि अतुल गावंडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.











