• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
November 21, 2026
in राजकारण
0
आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!
0
SHARES
376
VIEWS

 आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा! पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळणार!

धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार मंत्रिपदाचे बळ! आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाचे संकेत; २८ ते २९ नोव्हेंबरदरम्यान शपथविधी होण्याची शक्यता

मुंबई | लोकविचार

दोन ते अडीच वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर धाराशिव जिल्ह्याला पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुती सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे संकेत मुंबईतील विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहेत. विशेष म्हणजे, २८ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, या घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेले प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. मात्र, त्यावेळी अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याची माहिती समोर येत आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर २६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी माहिती मुंबईतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामध्ये २८ किंवा २९ नोव्हेंबरला शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळण्यामागे त्यांचा प्रशासकीय कामकाजाचा अनुभव, निर्णयक्षमता आणि आक्रमक कार्यशैली महत्त्वाची ठरू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यापूर्वी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून काम करताना त्यांनी अनेक विषयांवर तातडीने निर्णय घेण्याची भूमिका घेतली होती. एखादा प्रश्न समोर आल्यानंतर तो प्रलंबित न ठेवता संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने कार्यवाही करून घेण्याची त्यांची पद्धत ही त्यांच्या कामकाजाची ओळख राहिली आहे. अधिकाऱ्यांना कामाची स्पष्ट दिशा देणे, निर्णयांची अंमलबजावणी करून घेणे आणि जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे, या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

सावंतांना संधी मिळाल्यास जिल्ह्याच्या विकासाला नवी गती

धाराशिव जिल्हा हा दीर्घकाळापासून विकासाच्या अनेक प्रश्नांशी झुंज देत आहे. सिंचन, पाणीपुरवठा, शेती, आरोग्य सुविधा, रस्ते, रोजगार, औद्योगिक विकास आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न आजही मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रभावी प्रतिनिधित्व मिळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळाल्यास जिल्ह्यातील विविध विकासकामांना मंत्रालयीन स्तरावर गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

विशेषतः जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, रखडलेली विकासकामे, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण आणि युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मंत्रालयीन यंत्रणा यांच्यात समन्वय साधून विकासकामांना गती देण्यासाठी मंत्रिपदाचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. सावंत यांची तातडीने निर्णय घेण्याची क्षमता आणि काम करून घेण्याची शैली लक्षात घेता त्यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाकडे जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

मंत्रिमंडळात कोणाची विकेट पडणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता

दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना विद्यमान मंत्र्यांपैकी कोणाला डच्चू मिळणार आणि नव्या चेहऱ्यांना कोणती संधी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांमुळे कोणत्याही मंत्र्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये, तसेच विस्ताराबाबतची माहिती आधीच सार्वजनिक होऊ नये, यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून कमालीची गुप्तता पाळली जात असल्याची चर्चा आहे.

राज्याचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याने त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत होणाऱ्या राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

एकंदरीत, आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमनाच्या चर्चेमुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या रूपाने जिल्ह्याला पुन्हा एकदा लाल दिवा मिळाल्यास जिल्ह्याच्या विकासाच्या अपेक्षांना नवी दिशा मिळू शकते. आता महायुतीचे वरिष्ठ नेते कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात आणि धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मंत्रिपदाचे प्रतिनिधित्व मिळते का, याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

Related Posts

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani
राजकारण

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

November 20, 2026
सावरकर चौक ते काळा मारुती चौक रस्त्याच्या कामात काळ्या मातीचा भराव;
राजकारण

सावरकर चौक ते काळा मारुती चौक रस्त्याच्या कामात काळ्या मातीचा भराव;

November 19, 2026
नीरा-भीमा जोड बोगद्याचे काम जून २०२३ पासून बंद;
राजकारण

नीरा-भीमा जोड बोगद्याचे काम जून २०२३ पासून बंद;

November 16, 2026
नगरसेविका ज्ञानेश्वरी निकम यांचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

नगरसेविका ज्ञानेश्वरी निकम यांचा भाजपमध्ये प्रवेश

October 31, 2026
पदवीधरांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र काम करा; शरद पवार
राजकारण

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र काम करा; शरद पवार

October 30, 2026
विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
राजकारण

विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

October 29, 2026

ताज्या घडामोडी

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

November 20, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!