• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
November 19, 2026
in महाराष्ट्र
0
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;
0
SHARES
12
VIEWS

येडशी दुर्घटनेनंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय; धाराशिव नगर परिषदेला तीन अद्ययावत अग्निशमन वाहनांसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रभावी पाठपुरावा करत पालकमंत्र्यांनी मिळवून दिली विशेष बाब म्हणून मंजुरी; जिल्ह्याच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेला मिळणार बळ, ग्रामीण भागालाही अग्निशमन सेवेचा लाभ देण्याचे नियोजन!

मुंबई | लोकविचार

येडशी येथील भीषण आग दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील अग्निशमन यंत्रणेच्या मर्यादा आणि अपुऱ्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केवळ आढावा बैठकीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून जिल्ह्याच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेला बळ देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे धाराशिव नगर परिषदेला तीन अद्ययावत अग्निशमन वाहने खरेदी करण्यासाठी तब्बल ४ कोटी ५० लाख १० हजार रुपयांच्या निधीला राज्य शासनाने विशेष बाब म्हणून तातडीने मंजुरी दिली आहे.

त्यामुळे धाराशिव शहरासह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.येडशी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन यंत्रणेचा सविस्तर आढावा घेण्यात आला होता.

या बैठकीत जिल्ह्यातील नगर परिषदांच्या अग्निशमन सुविधांची सद्यस्थिती, वाहनांची उपलब्धता, मनुष्यबळाची कमतरता आणि आवश्यक बचाव साहित्य याबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्याच्या गरजा लक्षात घेऊन सर्वसमावेशक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देतानाच आवश्यक निधीसाठी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली.बैठक संपताच प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करत प्रताप सरनाईक यांनी नगरविकास विभागाकडे विशेष बाब म्हणून निधी मंजुरीसाठी तातडीने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, ४ कोटी ५० लाख १० हजार रुपयांच्या खर्चास शासनाने मंजुरी दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा निर्णय मार्गी लागल्याचे सांगत पालकमंत्री सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले.धाराशिव जिल्ह्यात केवळ १० अग्निशमन वाहने उपलब्ध असून आणखी नऊ वाहनांची आवश्यकता असल्याची बाब आढावा बैठकीत समोर आली. याची गांभीर्याने दखल घेत जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांकडून अग्निशमन अधिकारी, कर्मचारी, वाहनांची संख्या, बचाव साहित्य आणि आधुनिक उपकरणांच्या आवश्यकतेचा तपशील मागविण्याचे निर्देश देण्यात आले. अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठीही आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

त्यामुळे केवळ वाहने खरेदी न करता सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीनेही पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.ग्रामीण भागालाही मिळणार अग्निशमन सेवेचे संरक्षणअग्निशमन सेवा केवळ नगर परिषदांच्या हद्दीपुरती मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातील नागरिकांनाही वेळेत मदत मिळावी, अशी दूरदृष्टीपूर्ण भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली आहे.

नगर परिषदांलगतच्या गावांपर्यंत अग्निशमन वाहन किती वेळात पोहोचू शकते, याचा विचार करून प्रत्येक नगर परिषदेचे अग्निशमन कार्यक्षेत्र निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वाहनांची संख्या, मनुष्यबळ आणि बचाव साहित्याचे नियोजन करताना ग्रामीण लोकसंख्येचाही विचार केला जाणार आहे.जिल्ह्यातील फटाका उद्योग आणि अन्य संवेदनशील ठिकाणी आग लागण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन अशा परिसरात स्वतंत्र अग्निशमन केंद्र किंवा अग्निशमन युनिट उभारण्याच्या दृष्टीनेही पालकमंत्र्यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय दिवाळी काळातील आगीच्या घटना, उपलब्ध वाहने, मनुष्यबळ आणि आपत्ती व्यवस्थापन साहित्याचाही त्यांनी आढावा घेतला.येडशी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना देण्यात आलेल्या शासकीय मदतीची माहिती घेत मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त मदत मिळवून देण्यासाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचाही पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

एकूणच, येडशी येथील हृदयद्रावक दुर्घटनेनंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दाखविलेली तत्परता, प्रशासनाला दिलेले स्पष्ट निर्देश आणि अवघ्या बैठकीनंतर निधी मंजुरीसाठी केलेला प्रभावी पाठपुरावा कौतुकास्पद आहे.

तीन अद्ययावत अग्निशमन वाहनांसाठी मंजूर झालेला साडेचार कोटी रुपयांचा निधी हा केवळ वाहन खरेदीचा निर्णय नसून भविष्यात अशा दुर्घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेला सक्षम करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

पालकमंत्र्यांच्या या पुढाकारामुळे धाराशिव जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद धाराशिवफायर ब्रिगेड
Previous Post

सावरकर चौक ते काळा मारुती चौक रस्त्याच्या कामात काळ्या मातीचा भराव;

Next Post

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

Related Posts

दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा
महाराष्ट्र

दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा

November 17, 2026
एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!
महाराष्ट्र

एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!

November 16, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

November 16, 2026
तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा
महाराष्ट्र

तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा

November 16, 2026
अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस
महाराष्ट्र

अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस

November 16, 2026
चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव द्या
महाराष्ट्र

चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव द्या

November 15, 2026
Next Post
तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

ताज्या घडामोडी

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

November 20, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!