• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव द्या

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
November 15, 2026
in महाराष्ट्र
0
चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव द्या
0
SHARES
1
VIEWS

पारधी बांधवांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी; शासन सर्वतोपरी मदत करेल – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव शहरातील चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव द्या; शहरात भव्य पुतळा उभारण्याचेही आवाहन

ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक आदिवासी नृत्य आणि फटाक्यांच्या आतषबाजीत बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

धाराशिव, दि. १५ (प्रतिनिधी) :भगवान बिरसा मुंडा यांचे क्रांतिकारी विचार, त्यांचे कार्य आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे धाराशिव शहरातील एका चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यासाठी नगर परिषदेने आगामी सर्वसाधारण सभेत ठराव घ्यावा. तसेच शहरात भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी सर्वांनी वैयक्तिक स्तरावर आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार पाटील बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, नगराध्यक्ष नेहा काकडे, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, महिला व बालविकास सभापती वैशाली सोनवणे, नगरसेविका वंदना बापू पवार, माजी नगरसेवक बापू पवार, दत्ता पेठे, दादा पवार, नानासाहेब पवार, संजय पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुला-मुलींना नियमितपणे शाळेत पाठवावे. विशेषतः कुटुंबातील माता शिक्षित असेल, तर संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होतो. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीने प्रगतीची शिखरे गाठावीत. पारधी समाजातील बांधवांना उद्योग-व्यवसाय सुरू करताना अडचणी येत असतील, तर शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल. घरकुल, रोजगार तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळविताना काही अडचणी येत असल्यास थेट संपर्क साधावा. कोणत्याही अडचणीला न घाबरता पुढे या, शासनाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. महिलांनीही शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योग-व्यवसायात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांनी अत्यंत कमी वयात क्रांतिकारी विचार आत्मसात करून ब्रिटिश सत्तेविरोधात प्रखर लढा उभारला. त्यांचे कार्य आणि संघर्ष प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. पारधी समाजाने त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे. आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण देऊन सक्षम बनवावे. महापुरुषांच्या जयंतीप्रमाणेच भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीही समाजाने मोठ्या उत्साहात साजरी करावी. त्यांच्या कार्याचे स्मरण कायम राहण्यासाठी धाराशिव शहरातील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून नगर परिषदेने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर चिमुकल्या बालकांपासून युवक-युवती, महिला आणि पुरुषांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषेत विविध नृत्ये व लेझीम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक ढोलीबाजा आणि फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीत भगवान बिरसा मुंडा यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. या सोहळ्यास पारधी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

दुय्यम न्यायालयीन कर्मचारी संपावर!

Next Post

अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस

Related Posts

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;
महाराष्ट्र

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा
महाराष्ट्र

दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा

November 17, 2026
एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!
महाराष्ट्र

एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!

November 16, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

November 16, 2026
तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा
महाराष्ट्र

तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा

November 16, 2026
अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस
महाराष्ट्र

अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस

November 16, 2026
Next Post
अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस

अग्निशमन सेवा अद्ययावत करा - काँग्रेस

ताज्या घडामोडी

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

November 20, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!