प्रभाग क्रमांक २० मधील पाणीटंचाईवर नगरसेवक विलास (बापू) लोंढे यांचा पुढाकार; तीन बोअरवेलला पाणी लागल्याने नागरिकांना दिलासा!
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, मल्हार पाटील यांच्या खंबीर साथीने दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न
धाराशिव | लोकविचार
धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक २० मध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती विलास (बापू) लोंढे यांनी पुढाकार घेतला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवानेते मल्हार पाटील यांच्या खंबीर साथीने जुना बस डेपो परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी तीन ठिकाणी बोअरवेल घेण्यात आल्या. विशेष म्हणजे तिन्ही बोअरवेलला पाणी लागल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या बोअरवेल घेण्यापूर्वी संबंधित भागातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष बोअरवेलचे काम सुरू करण्यात आले. यामध्ये शाळा क्रमांक १३ येथील बोअरवेलला दोन इंच, रहीबर चौक, जुना बस डेपो परिसरातील बोअरवेलला तीन इंच, तर डोंगरवस्ती, जुना बस डेपो परिसरातील बोअरवेलला दोन इंच पाणी लागले आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी धावपळ लक्षात घेऊन विलास (बापू) लोंढे यांनी या प्रश्नाला प्राधान्य दिले. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून नागरिकांना दिलासा देण्याचा त्यांचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला आहे.
तीनही ठिकाणी बोअरवेलला मुबलक पाणी लागल्याने प्रभाग क्रमांक २० मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती विलास (बापू) लोंढे यांचे प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनी आभार मानले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











