• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
November 16, 2026
in महाराष्ट्र
0
अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस
0
SHARES
21
VIEWS

धाराशिव जिल्ह्यातील अग्निशमन सेवा अद्ययावत व सक्षम करा –धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष धनंजय राऊत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…


धाराशिव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील अग्निशमन दलाची सेवा अधिक सक्षम व अद्ययावत करून आवश्यक अग्निशमन वाहने, आधुनिक साधनसामग्री, पुरेसा इंधनसाठा तसेच अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे वतीने जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धनंजय राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आग लागणे, इमारतींना आग लागणे, शॉर्टसर्किट, अपघात तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी अग्निशमन दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी अग्निशमन दलाकडे पुरेशी व आधुनिक वाहने, प्रशिक्षित कर्मचारी आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धाराशिव शहर व जिल्ह्याच्या गरजेनुसार आधुनिक अग्निशमन गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, सध्या कार्यरत वाहनांची नियमित देखभाल करावी, वाहनांमध्ये पुरेसा पाणीसाठा, पंप, पाइप, शिड्या, हायड्रॉलिक कटर व ब्रेकर यांसारखी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अग्निशमन वाहनांसाठी पुरेसा डिझेल साठा उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना फायरप्रूफ कपडे, हेल्मेट, ऑक्सिजन मास्क, श्वसन उपकरणे, हातमोजे, बूट व इतर सुरक्षा साहित्य देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय अग्निशमन कर्मचाऱ्यांना आधुनिक उपकरणे हाताळण्याचे नियमित प्रशिक्षण द्यावे, ग्रामीण व शहरी भागात तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रभावी नियोजन करावे आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून २४ तास अग्निशमन सेवा तत्पर ठेवावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
आग लागल्यानंतर मदत पोहोचण्यास विलंब होणे किंवा आवश्यक साधनसामग्री उपलब्ध नसणे यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अग्निशमन दल केवळ नावापुरते सक्षम न राहता प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच निवेदनातील मागण्यांवर केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी धनंजय राऊत यांनी केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासह खलील सय्यद,प्रशांत पाटील,अग्निवेश शिंदे, गोरोबा झेंडे,
राजुदास आडे, अशोक बनसोडे, आरिफ मुलानी, पोपट शिंदे, अविनाश रणखांब, विश्वजीत बनसोडे, बाबा मोमीन, अभिमान पेठे, दयानंद नागापुरे, अंकुश पेठे, जयसिंग पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी उपस्थित होते.

Tags: Congressdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलकाँग्रेसधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकप्रियंका गांधीराहुल गांधी
Previous Post

चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव द्या

Next Post

तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा

Related Posts

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;
महाराष्ट्र

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा
महाराष्ट्र

दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा

November 17, 2026
एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!
महाराष्ट्र

एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!

November 16, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

November 16, 2026
तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा
महाराष्ट्र

तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा

November 16, 2026
चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव द्या
महाराष्ट्र

चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव द्या

November 15, 2026
Next Post
तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा

तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा

ताज्या घडामोडी

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

November 20, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!