• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 15, 2026
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
0
SHARES
318
VIEWS

दुष्काळग्रस्त धाराशिवमधील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले; 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पुढाकार; फराळाचे साहित्य, कंदील, पणत्या, कालनिर्णयासह विविध वस्तूंचा किटमध्ये समावेश

ठाणे | लोकविचार

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप करण्यात येणार आहे. यासोबतच मतदारसंघातील गोरगरीब जनतेलाही या किटचे वाटप केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबांनाही दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने दिवाळी किट तयार करण्यात आले आहे. या किटमध्ये दिवाळीच्या फराळाचे साहित्य, कंदील, पणत्या, कालनिर्णय यांसह विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी शिवसैनिक सक्रिय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेले हे दिवाळी किट धाराशिव जिल्ह्यातील गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख कार्यरत राहणार आहेत. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

याबाबत बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी मोठ्या संकटात सापडले आहेत. या कठीण परिस्थितीत बळीराजाच्या घरातही दिवाळीचा आनंद पोहोचला पाहिजे. शेतकरी कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू फुलले पाहिजे, हीच आपली भावना आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना शक्य ती मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या सणात दिलासा देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना मदतीचा हात मिळणार आहे.

 यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेवक राकेश शिंदे, नगरसेविका शीतल ढमाले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलदिवाळी भेटदीपावलीधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

Next Post

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

Related Posts

दुय्यम न्यायालयीन कर्मचारी संपावर!
महाराष्ट्र

दुय्यम न्यायालयीन कर्मचारी संपावर!

November 14, 2026
नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे बंद!
महाराष्ट्र

नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे बंद!

November 13, 2026
राजेनिंबाळकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार!
महाराष्ट्र

राजेनिंबाळकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार!

November 11, 2026
आगीच्या दुर्घटनेत नुकसान झालेल्या भोसले कुटुंबीयांना मल्हार पाटील यांचा मदतीचा दिलासा!
महाराष्ट्र

आगीच्या दुर्घटनेत नुकसान झालेल्या भोसले कुटुंबीयांना मल्हार पाटील यांचा मदतीचा दिलासा!

November 11, 2026
येडशी गावात अग्नितांडव! दुकानाला लागलेल्या आगीने शेजारील घरही भक्ष्यस्थानी;
महाराष्ट्र

येडशी गावात अग्नितांडव! दुकानाला लागलेल्या आगीने शेजारील घरही भक्ष्यस्थानी;

November 9, 2026
नाल्याच्या बांधकामात काळ्या मातीवरच थेट काँक्रिटीकरण!
महाराष्ट्र

नाल्याच्या बांधकामात काळ्या मातीवरच थेट काँक्रिटीकरण!

November 6, 2026
Next Post
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या - प्रदेशाध्यक्ष तटकरे

ताज्या घडामोडी

दुय्यम न्यायालयीन कर्मचारी संपावर!

दुय्यम न्यायालयीन कर्मचारी संपावर!

November 14, 2026
गोरोबा काकांच्या पालखीचे swagat

गोरोबा काकांच्या पालखीचे swagat

November 14, 2026
नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे बंद!

नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे बंद!

November 13, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!