• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 16, 2026
in राजकारण
0
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
0
SHARES
0
VIEWS

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) – पदवीधर व शिक्षक यांचे विविध प्रश्न सतीश चव्हाण यांनी सभागृहात अभ्यासपूर्ण मांडून त्याची सोडवणूक केली आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळेच छत्रपती संभाजी नगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विधी महाविद्यालय स्थापन झाले आहे. तर मेडिकलचा फॉर्म्युला ठरवून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्याचे काम केले आहे. यासह इतर विविध विकास कामे चव्हाण यांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे अशा अभ्यासू नेतृत्व गुण असलेल्या सतीश चव्हाण यांना चौथ्यांदा निवडून देऊन सभागृहात पाठवावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दि.१५ ऑक्टोबर रोजी केले.

धाराशिव शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील, आमदार बसवराज पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, विद्यापीठ सीनियर सदस्य अंकुश कदम, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन तावडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अप्सरा पठाण, माजी प्राचार्य डॉ रमेश दाबके, राष्ट्रवादी शिक्षक विभागाचे बालाजी तांबे, सुरेश बिराजदार, प्रकाश आष्टे आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, मराठवाड्यात उद्योगाचे प्रमाण कमी आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रचंड मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अधिकाऱ्यांचे प्रमाण देखील अधिक वाढल्याचे त्यांनी सांगितले. तर १९७२ ला पडलेल्या दुष्काळामध्ये अन्नाची टंचाई होती. मात्र यावर्षीच्या दुष्काळात पाणी नाही त्यामुळे अनेक धरणे कोरडे ठक पडले आहेत. शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिक अडचणीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात आणण्याचा महायुती सरकारने निर्णय घेतला असून गोदावरी खोरे पाण्याने भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांना राज्य सरकारने मदत जाहीर केली असून आणखी भरीव मदत केंद्राकडून मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मराठवाड्यात पाणी आडविण्याची कामे मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. खरीप गेले रब्बीची देखील शक्यता नाही असे सांगत ते म्हणाले की, कोकणातील पाणी पातळी देखील खालावत चालली असून ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अजितदादांनी शेतकरी कर्जमाफीचा शब्द दिला होता. त्यानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तर आमदार बसवराज पाटील म्हणाले की, उद्याचे मतदान दुष्काळ दूर करण्याला अनुशेष भरून काढण्याला करायचे आहे. कारण सतीश चव्हाण यांनी आजपर्यंत वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी काम केलेले आहे. ते पहिल्या निवडणुकीत ७० हजार मतांनी विजयी झाले होते, त्यापेक्षा जास्त मताने निवडून येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मराठवाडा कायम दुष्काळ मुक्त झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री काम करत असल्याचे सांगत त्यांनी मराठवाड्याला न्याय कसा देता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, आमदार सत्ताधारी असला तरच विकासाची कामे अतिशय ताकदीने करता येतात. विकासाची कामे करण्यासाठी आपल्या हक्काचा आमदार असणे गरजेचे आहे. विरोधक आपले नेहमीप्रमाणे विरोधकांचे काम करीत आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांनी ताकदीने काम करावे. विशेष म्हणजे आता तर महायुती एकत्र असल्यामुळे चव्हाण हे चौथ्यांदा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर उमेदवार सतीश चव्हाण म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री आमचे दादा इथे नाहीत, त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. दादा नेहमी आम्हास तू भिऊ नकोस मी आहे असे म्हणून विश्वास दाखवत होते. त्यामुळे दादांनी दाखविलेला विश्वास विसरता येणार नाही. आमची विचारधारा फुले शाहू आंबेडकर आहे. मात्र, यावेळी आम्ही भाजपसोबत असलो तरी आम्ही आमची विचारधारा सोडणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मी आजपर्यंत पदवीधर आणि शिक्षक यांच्यासाठी काम केले आहे. मध्ये विनाअनुदानित कायम शब्द काढला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विधी महाविद्यालय औरंगाबादला स्थापन केले. मेडिकलच्या ऍडमिशनचा फार्मूला तयार केला. त्यामुळे मराठवाड्यातील १ हजार विद्यार्थ्यांचे आहे प्रवेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील विद्यार्थी इथेच शिकला आणि राहिला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडा मला निवडून द्या, आपल्याला अपेक्षित असलेली काम करण्याचा प्रयत्न करीन असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हनुमंत गायकवाड, अमर मडके, सिनेट सदस्य प्रा अंकुश कदम, डॉ रमेश दाबके, राहुल मोटे व सुरेश बिराजदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी तांबे यांनी तर उपस्थितांचे आभार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सचिन तावडे यांनी मानले. या मेळाव्यास पदवीधर, शिक्षक, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप महायुतीचे पदाधिकारीव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चव्हाण यांना निवडून देऊन अजित दादांचे स्वप्न पूर्ण करावे – मंत्री पाटील

सतीश चव्हाण हे घुसून काम करणारे म्हणून ओळखले जातात. कारण त्यांनी सभागृहात पदवीधर व शिक्षक यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. तर प्रत्येकाला नोकरी देणे शक्य नसून तरुणांनी कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यंदा दुष्काळाची दाहकता असल्यामुळे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करावी लागतील, असे सांगत मतदारांनी चव्हाण यांना मतदानरुपी आशीर्वाद देऊन अजित दादांचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन ना. पाटील यांनी केले.

Tags: dharashiv collectorआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!