धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मा.आ.शशिकांत शिंदे यांची उपस्थिती; डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजन
धाराशिव लोकविचार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पदवीधर संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १७ रोजी सायंकाळी चार वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, बार्शी नाका,धाराशिव येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा मा.आ शशिकांतजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या संवाद मेळाव्यात मराठवाड्यातील पदवीधर मतदारांशी संवाद साधण्यात येणार असून, पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारी, रोजगाराच्या संधी, शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या तसेच पदवीधरांच्या अपेक्षा यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून पदवीधरांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचाव्यात, या दृष्टीने या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमुळे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तरी धाराशिव शहर व जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील सर्व पदवीधर मतदार बांधवांनी शनिवार, दि. २७ रोजी स्वयंवर मंगल कार्यालय, बार्शी नाका, धाराशिव येथे आयोजित पदवीधर संवाद मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.










