भाजपला धाराशिवमध्ये मोठा धक्का! आक्रमक नेते नितीन बाप्पा शेरखाने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेशधाराशिव शहरासह सांजा गावातील राजकीय समीकरणांना नवी दिशा; खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते जाहीर पक्षप्रवेशधाराशिव | लोकविचारधाराशिव शहरातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून, भाजपाचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले नितीन बाप्पा शेरखाने, गफूर भाई शेख, शंकर बाप्पा सूर्यवंशी, मालोजी भैय्या सूर्यवंशी यांच्यासह भाजपातील अनेक पदाधिकारी आणि दिग्गज नेत्यांनी एकाच वेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपला शहरात मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून, शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धाराशिव शहर व सांजा गावातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते हा जाहीर पक्षप्रवेश पार पडला.वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे यांचा आदर्श आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे धाराशिव शहरात शिवसेनेला नवे बळ मिळाले असून, भाजपसाठी ही राजकीय घडामोड आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.एकाच वेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने धाराशिवच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.या पक्षप्रवेशातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे भाजपाचे आक्रमक नेते नितीन बाप्पा शेरखाने यांचा शिवसेनेतील प्रवेश. शेरखाने यांच्यासह अनेक नेत्यांनी एकाच वेळी पक्षांतर केल्याने भाजपच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीला धक्का बसल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे शिवसेनेला धाराशिव शहरात आपली ताकद वाढविण्याची संधी मिळाली आहे. या घडामोडींचा आगामी स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.या पक्षप्रवेशात नितीन बाप्पा शेरखाने, गफूर भाई शेख, शंकर बाप्पा सूर्यवंशी, मालोजी भैय्या सूर्यवंशी, रवी रोहिदास, संजय रोहिदास धावारे, प्रतीक शेरखाने, प्रेम शेरखाने, पद्माकर शेरखाने, हरून शेख, समीर शेख, हाजी शेख, संतोष धावारे, रणजीत राठोड, तानाजी धज, जलील शेख, उस्मान शेख, कोंडली शेख, अजय माने, रणजीत कदम, राम मडके, ओमराज अडचुळे, मोतीलाल तांबोळी, रहीम शेख, आसिफ शेख, शोएब शेख, सैफ शेख, शहबाज शेख, वाजिद शेख, कलीम शेख, रिजवान शेख, बालाजी झोंबाडे, सागर पाटील, युसुफ शेख, लाला शेख, हाजी भाई शेख, मुस्तकीन शेख, रियान शेख, शाहीर शेख, फरीद शेख, रसूल भाई शेख, अमीन शेख, शफिक शेख, बिलाल शेख, आकाश गव्हाणे, अमन शेख, रोहित राठोड, कौस्तुभ माने, वैभव राठोड, ओमकार धस, दत्ता डुकरे, अरिफ शेख, मुल्ला शेख, आरमान बेटेकर, राजू शेख, जाफर शेख, राजू मौलाना, तौफिक शेख, सद्दाम पठाण, हाजू शेख, पुनुस शेख, सद्दाम शेख, जमीर शेख, तयार मौलाना, सागर शेळके, सागर आवटे आणि सुदर्शन सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.यावेळी सोमनाथ आप्पा गुरव, नगरसेवक प्रदीप मुंडे, पप्पू मुंडे, तुषार निंबाळकर, पृथ्वीराज चिलवंत, भीमा जाधव, लिंबराज डुकरे, गणेश जगताप, विकास जाधव, रवी कोरे, कृष्णा मुंडे आणि आदित्य हंबीरे यांची प्रमुख उपस्थिती होती.











