• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

स्त्री रुग्णालयाला वाढीव जागा द्या – शहर काँग्रेसची पालकमंत्र्याकडे मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 17, 2025
in आरोग्य
0
0
SHARES
0
VIEWS

स्त्री रुग्णालयाला वाढीव जागा द्या – शहर काँग्रेसची पालकमंत्र्याकडे ठाम मागणी
धाराशिव दी.१७(प्रतिनिधी):धाराशिव-उस्मानाबाद येथील स्त्री रुग्णालयात वाढत्या रुग्णभारामुळे सध्याची जागा अपुरी ठरत असून दररोज जिल्हाभरातून असंख्य गरोदर महिला प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल होत असतात. मात्र मर्यादित जागेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसने स्त्री रुग्णालयाला शेजारील जागा हस्तांतरित करून वाढीव सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राज्याचे परिवहन व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज पालकमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी मांडली. यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले की, रुग्णालयातील खाटांची संख्या अपुरी असल्याने अनेक गरोदर महिलांना प्रसूतीपूर्व काळात कॉरिडॉरमध्ये किंवा जमिनीवर बसून थांबावे लागते. काही वेळा रुग्णालयात बेड मिळत नसल्याने महिलांना खाजगी रुग्णालयाचा पर्याय स्वीकारावा लागतो. यामुळे गरीब कुटुंबीयांवर अतिरिक्त आर्थिक ओझे पडत असून, त्यांच्या आयुष्याचा प्रश्नच निर्माण होत आहे.
शिष्टमंडळाने सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तातडीची उपचारसुविधा उपलब्ध नसते. जागेअभावी शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या आवश्यक कक्षांची कमतरता आहे. यामुळे अनेक वेळा रुग्णांना धोका निर्माण होतो. अशा गंभीर परिस्थितीत तातडीने रुग्णालयासाठी शेजारील जागा हस्तांतरित करणे अत्यावश्यक असल्याचे मत काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री सरनाईक यांच्यासमोर मांडले.
या भेटीप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, युवा नेते अझर पठाण, महादेव पेठे, संजय गजधने आदी उपस्थित होते.
शहर काँग्रेस शिष्टमंडळाने सांगितले की, महिलांच्या आरोग्याशी निगडित हा गंभीर प्रश्न असून प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन स्त्री रुग्णालयाला वाढीव जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadosmanabad jilhadhikaripolice adhikashakउस्मानाबादजिल्हा शासकीय रुग्णालयजिल्हाधिकारी कार्यालयधाराशिवधाराशिव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयपरिवहन मंत्रीपालकमंत्रीप्रताप सरनाईकमेडिकल कॉलेज महाराष्ट्रस्त्री रुग्णालय धाराशिव
Previous Post

शिवसेनेत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश… पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सोहळा संपन्न

Next Post

आठ दिवसात 140 कोटीच्या धाराशिव शहरातील रस्ते कामाची फेरनिविदा काढू…पालकमंत्री सरनाईक

Related Posts

मास्क काढा म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत;
आरोग्य

मास्क काढा म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत;

September 19, 2026
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही
आरोग्य

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही

September 6, 2026
भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील
आरोग्य

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील

July 22, 2026
भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ
आरोग्य

भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ

July 22, 2026
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
आरोग्य

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

July 16, 2026
आरोग्य

हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात

February 13, 2026
Next Post

आठ दिवसात 140 कोटीच्या धाराशिव शहरातील रस्ते कामाची फेरनिविदा काढू...पालकमंत्री सरनाईक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!