• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 22, 2026
in आरोग्य
0
भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील
0
SHARES
20
VIEWS

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील

धाराशिव लोकविचार

महाराष्ट्राचे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने आयोजित या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मल्हार पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी बोलताना मल्हार पाटील यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, वैद्यकीय सल्ला, औषधोपचार तसेच आवश्यक असल्यास पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांवर तेरणा हॉस्पिटल, नेरुळ येथे मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कन्या शाळा मल्टिपर्पज मैदान धाराशिव येथे सुरू असलेल्या या महाआरोग्य शिबिरात सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आरोग्य तपासणी करून घेतली. पावसाचे वातावरण असतानाही ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. पहिल्याच वर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे असे महाआरोग्य शिबिर दरवर्षी आयोजित करण्याचा मानस मल्हार पाटील यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान उपक्रमात अनेक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.

धाराशिव जिल्ह्यातील सर्व गरजू नागरिकांनी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही मल्हार पाटील यांनी केले.

या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, नगराध्यक्षा सौ. नेहाताई राहुल काकडे, तेरणा ट्रस्टचे विश्वस्त अशोकभाऊ शिंदे, विजेंद्र अण्णा चव्हाण, सतीश दंडनाईक, देशमुख सर, अनिल काळे, खंडेराव चौरे, संपतराव डोके, नितीन भोसले, पंचायत समिती सभापती सौ. गोकर्णाताई कदम, उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, नगर परिषद बांधकाम सभापती अभिजीत काकडे, शिक्षण सभापती प्रवीण माळी, नियोजन समिती सभापती आकाश तावडे, पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे,भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल काकडे,नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे,धनंजय पाटील, सुशांत सोनवणे यांच्यासह तेरणा वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि जिल्हाभरातून आलेले असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectorLokvicharआमदार कैलास पाटीलआरोग्य विभाग धाराशिव बेमुदत संप आंदोलन मोर्चा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचार
Previous Post

भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ

Next Post

धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गतीसर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Related Posts

मास्क काढा म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत;
आरोग्य

मास्क काढा म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत;

September 19, 2026
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही
आरोग्य

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही

September 6, 2026
भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ
आरोग्य

भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ

July 22, 2026
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
आरोग्य

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

July 16, 2026
आरोग्य

हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात

February 13, 2026
आरोग्य

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नौमान शेख यांचा अधिष्ठाता चौहान यांच्या हस्ते गौरव

January 26, 2026
Next Post
धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गतीसर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गतीसर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!