• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव शहरातील मुख्य रस्त्यांच्या मलमपट्टीचा पंचनामा  दिला आंदोलनाचा इशारा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 21, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव शहरातील मुख्य रस्त्यांच्या मलमपट्टीचा पंचनामा
पावसाने उघडकीस आणली ठेकेदाराच्या कामाची बोगसगिरी
मविआने अधिकारी व ठेकेदाराची कानउघाडणी करत दिला आंदोलनाचा इशारा
धाराशिव, दि. 21
धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा चौक या मार्गावरील रस्त्याच्या मलमपट्टीचा पावसानेच पंचनामा केल्यामुळे ठेकेदाराच्या बोगसगिरीचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी कायम असून एकाचा बळी आणि अनेक जायबंदी झाल्यावर देखील जाग न आलेल्या प्रशासनाच्या विरोधात महविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे रस्त्याच्या बोगस मलमपट्टीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा चौक या मार्गाची बेहद दुर्दशा झालेली आहे. याच मार्गावर शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठ  असल्यामुळे हा रस्ता कायम वर्दळीचा आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मध्यंतरी एका युवा उद्योजकाचा दुचाकी खड्डयात अडकून दुर्दैवी अंत झाला. तर याच मार्गावर अनेक जण जायबंदी झाले आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ रस्त्याची कामे करून जनतेची गैरसोय दूर करावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे पदाधिकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर या मार्गावरील खड्डयात डबर आणि त्यावर मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली. परंतु खड्डयात सिमेंट काँक्रिट किंवा इतर कोणत्याही मजबूत साहित्याचा वापर न केल्याने पावसाने खड्डे पुन्हा कायम आहेत.सदरील खड्डे हे सिमेंट काँक्रीट किंवा डांबरीकरणाने बुजवण्यात यावेअशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे.

पुन्हा जीवितहानी होऊ नये यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी एमएसआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खड्डे बुजविण्याच्या बोगस कामाचा पंचनामा केला. या बोगस कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे रोहित बागल, युवा सेना शहरप्रमुख अभिराज कदम, सुमित बागल, अमित उंबरे, शिवराज आचार्य, मनोज उंबरे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: dharashivdharashiw shaharosmanabad cityआंदोलनउस्मानाबादधाराशिवमहाविकास आघाडीरास्तारोकोविकास
Previous Post

धाराशिव शहराच्या मंजूर 140 कोटी रुपयांच्या 59 रस्त्यांची कामे तत्काळ सुरु करा आ कैलास पाटील

Next Post

श्री सिद्धिविनायक परिवाराकडून शेतकऱ्यांना अंतिम 200 रुपयांचा हप्ता जमा

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

श्री सिद्धिविनायक परिवाराकडून शेतकऱ्यांना अंतिम 200 रुपयांचा हप्ता जमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!