• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

एसपी अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर पोलिसांचा छापा; ५० लाखांहून अधिक साहित्य जप्त

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 24, 2026
in क्राईम
0
एसपी अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर पोलिसांचा छापा; ५० लाखांहून अधिक साहित्य जप्त
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एसपी अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर पोलिसांचा छापा; ५० लाखांहून अधिक साहित्य जप्त

बार्शी लोकविचार

तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेल्या कला केंद्रांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत “लवंगी मिरची” कला केंद्रावर मध्यरात्री छापा टाकून तब्बल ५० लाख १३ हजार ४६० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिस प्रशासनाच्या कठोर भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

त्यानुसार प्रभावी पेट्रोलिंग, नाकाबंदी आणि संशयित ठिकाणांची तपासणी सुरू असताना दिनांक २४ मे २०२६ रोजी पहाटे १:३० वाजण्याच्या सुमारास बार्शी-लातूर रोडवरील “लवंगी मिरची” कला केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या वेळेनंतरही सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.माहितीची खातरजमा करून पोलिस पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी कला केंद्रात नृत्य सुरू असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करत नृत्यांगना, ग्राहक, चालक व मालक अशा एकूण ७२ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.या धाडीत रोख रक्कम, मोबाईल फोन, विविध साहित्य, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच देशी दारूच्या बाटल्या असा एकूण ५० लाख १३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाईसोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व सह पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पो. नि. महेश माने यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यामध्ये पो. उपनिरीक्षक बालाजी वळसने, दत्तात्रय भालेराव, पोसई चंद्रकांत घोळवे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.दरम्यान, बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या काही कला केंद्रांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

व्यसन, आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक वादामुळे अनेकांनी आपले जीव गमावल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे अशा अवैध कला केंद्रांवर कायमस्वरूपी बंदी घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता गावकऱ्यांतून जोर धरू लागली आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, अवैध धंद्यांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा
Previous Post

हायवेवरील चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या २४ तासांत जप्त स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Next Post

धाराशिव बसस्थानक परिसरातील मोटारसायकल चोरीचा पर्दाफाशस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next Post
धाराशिव बसस्थानक परिसरातील मोटारसायकल चोरीचा पर्दाफाशस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

धाराशिव बसस्थानक परिसरातील मोटारसायकल चोरीचा पर्दाफाशस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.