• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ; “झाडे लावा, झाडे जगवा”चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संदेश

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 14, 2026
in महाराष्ट्र
0
एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ; “झाडे लावा, झाडे जगवा”चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संदेश
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ; “झाडे लावा, झाडे जगवा”चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संदेश

मुंबई लोकविचार 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्या विहार येथील विभागीय कार्यालयातून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार दिलीप लांडे, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या अभियानांतर्गत राज्यभरातील एसटीची बसस्थानके, आगारे, कार्यालये आणि विविध परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून भावी पिढ्यांसाठी हिरवा, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडविण्याचा सामूहिक संकल्प असल्याचे सांगितले. वाढते जागतिक तापमान, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटांसारख्या पर्यावरणीय संकटांचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे असून ती प्राणवायू पुरवतात, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, तापमान नियंत्रित ठेवतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. त्यामुळे एक झाड लावणे म्हणजे भविष्यातील अनेक संकटांवर उपाय उभा करणे होय, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एसटी महामंडळ हे केवळ प्रवासी सेवा देणारे परिवहन माध्यम नसून समाजाशी नाळ जोडलेली सामाजिक संस्था असल्याने समाजहिताचे आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे हीदेखील एसटीची सामाजिक बांधिलकी असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

वृक्षारोपण करून जबाबदारी संपत नाही, तर प्रत्येक रोप जगविणे, त्याचे संगोपन करणे आणि संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी “एक कर्मचारी – एक वृक्ष” आणि “एक नागरिक – एक वृक्ष” हा संकल्प स्वीकारण्याचे आवाहन केले. एसटीच्या प्रत्येक आगारात, बसस्थानकात आणि कार्यालय परिसरात हिरवाई निर्माण करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी आवाहन केले.

७८ व्या वर्धापन दिनानिमित्त “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक
Previous Post

येडशीतील युवक शेतकरी दगडू देशमुख यांचा भरदिवसा खून; येडशी–सोनेगाव रस्त्यावर मृतदेह आढळला, डॉग स्कॉड व फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

Next Post

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनाला प्रतिसाद धाराशिव बसस्थानकात विभाग नियंत्रक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

Next Post
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनाला प्रतिसाद धाराशिव बसस्थानकात विभाग नियंत्रक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनाला प्रतिसाद धाराशिव बसस्थानकात विभाग नियंत्रक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

Recent Posts

  • येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही
  • धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा
  • कळंबमध्ये अनैतिक देहव्यवसायावर पोलिसांचा छापा प्रभात लॉजमधून दोन महिलांची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनाला प्रतिसाद धाराशिव बसस्थानकात विभाग नियंत्रक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
  • एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ; “झाडे लावा, झाडे जगवा”चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संदेश

Recent Comments

  1. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Randy WebDev on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.