• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 13, 2026
in महाराष्ट्र
0
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
0
SHARES
8
VIEWS

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात; दोन लाखांची तातडीची मदत, दोन्ही मुलांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी!

भूम तालुक्यातील आत्महत्याग्रस्त जाधवर कुटुंबाला दिला आधार; संकटाच्या काळात धीर न सोडण्याचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे आवाहन

धाराशिव | लोकविचार

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील जयवंत नगर येथील तरुण शेतकरी योगेश दिनकर जाधवर (वय ३०) यांनी नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे जाधवर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पत्नी, आठ वर्षांचा मुलगा, चार वर्षांची मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार उघड्यावर पडला आहे. या कठीण प्रसंगी भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी जाधवर कुटुंबाला तातडीने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देत आधार दिला. तसेच कुटुंबातील दोन्ही चिमुकल्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या पालकत्वाची घोषणा केली.

तरुण शेतकऱ्याच्या निधनाची माहिती मिळताच आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी तत्काळ स्थानिक पदाधिकाऱ्यांना पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी पाठवले. यावेळी कुटुंबाला दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे निर्माण झालेल्या संकटात आर्थिक मदतीसोबतच मुलांच्या भवितव्याची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

दुष्काळाच्या संकटात धीर सोडू नका; आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका!

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी जनतेला भावनिक आणि संवेदनशील आवाहन केले. आपल्या भागात दुष्काळाचे संकट कितीही गंभीर असले, तरी शेतकरी बांधवांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी धीर सोडू नये. या कठीण परिस्थितीत आपण सर्वांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहून संकटाचा सामना केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना तातडीची आर्थिक मदत आणि दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याच्या निर्णयातून सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः वडिलांचे छत्र हरपलेल्या दोन लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी आधार निर्माण झाला आहे.

यावेळी युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, विशाल ढगे, बालाजी गुंजाळ, सुनील भोईटे, रामकिसन गव्हाणे, युवराज हुंबे, अजित पवार, प्रशांत काका मुंडेकर, गजेंद्रजी खुणे, सागर गटकळ, विजय जाधव, नारायण मोराळे, अंगद नागरगोजे, नामदेव नागरगोजे, गोरख नागरगोजे, मोहन नागरगोजे यांच्यासह मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शेतकरी बांधव आणि पत्रकार उपस्थित होते. 

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकशेतकरी आत्महत्या
Previous Post

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

Next Post

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
Next Post
परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!