• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 14, 2026
in क्राईम
0
परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
0
SHARES
25
VIEWS

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर; 

कळंब ड्रग्ज प्रकरणातील रेवण नखाते आणि अनीस तांबोळीला १५ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलीस कोठडी

धाराशिव | लोकविचार

परभणी येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात कळंबचे नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा याच्यासह सहा आरोपींना परभणी जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, कळंब येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झा आणि लखन गायकवाड यांचा नियमित जामीन अर्ज धाराशिव न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, कळंब ड्रग्ज प्रकरणातील आरोपी रेवण सोपान नखाते आणि त्याला ड्रग्ज पुरवठा केल्याचा आरोप असलेल्या कळंबच्या समतानगर परिसरातील अनीस अमरोद्दीन तांबोळी या दोघांना १५ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६५/२०२६ नुसार दाखल झालेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी तपासादरम्यान आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला होता. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे करीत आहेत.

या प्रकरणात सुरुवातीला २७ जुलै रोजी अलीम शेख खाजा (रा. पाथरी) आणि शाहरुख फिरोजखान पठाण (रा. अंबाजोगाई, जि. बीड) यांना १४ लाख ६३ हजार रुपये किमतीच्या ७२ ग्रॅम ड्रग्जसह अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान ७ ऑगस्ट रोजी कळंबचा नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा याच्यासह अकीब अक्रम मोमीन, बाबा मोमीन रफीक, सय्यद समीर सय्यद शब्बीर, शेख सलमान शेख इरफान आणि अयान नासेर पठाण या सहा जणांना अटक करण्यात आली होती. या सहा आरोपींना आता परभणी जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

मात्र, परभणी प्रकरणात जामीन मिळाला असला, तरी कळंब येथील स्वतंत्र ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील कायदेशीर प्रक्रिया सुरूच आहे. या प्रकरणात मोहसीन मिर्झा आणि लखन गायकवाड यांना धाराशिव न्यायालयाकडून नियमित जामीन मिळालेला नाही. त्यामुळे परभणी प्रकरणातील जामीन आणि कळंब प्रकरणातील न्यायालयीन कारवाई या दोन स्वतंत्र बाबी ठरल्या आहेत.

दरम्यान, कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात रेवण नखाते आणि अनीस तांबोळी यांना १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आल्याने या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

Next Post

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

Related Posts

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
Next Post
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? - आ. कैलास पाटील

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!