• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

दिवाळीच्या सुट्टीत बंद घराला चोरट्यांचा डाव;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
November 8, 2026
in क्राईम
0
दिवाळीच्या सुट्टीत बंद घराला चोरट्यांचा डाव;
0
SHARES
109
VIEWS

दिवाळीच्या सुट्टीत बंद घराला चोरट्यांचा डाव; आनंदनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न उधळला! 

पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या तत्परतेने कपाटातील चोर कप्प्यातच आढळले सोन्या-चांदीचे दागिने; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक

धाराशिव | लोकविचार

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक नागरिक आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईकांकडे जातात, तर काहीजण पर्यटनासाठी बाहेरगावी जाणे पसंत करतात. याच काळात बंद घरे हेरून चोरी करण्याच्या प्रयत्नात चोरटे सक्रिय होण्याची शक्यता असते. मात्र, धाराशिव शहरातील म्हाडा कॉलनी येथे चोरट्यांनी केलेला असाच एक चोरीचा प्रयत्न आनंदनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता तपासाची सूत्रे हाती घेत दोन स्वतंत्र पथके रवाना केली. पोलिसांच्या बारकाईने केलेल्या पाहणीत घरातील सोन्या-चांदीचे सर्व दागिने सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

म्हाडा कॉलनी येथील महेंद्रसिंग राजपूत यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घराचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाचे लॉक तोडून सामान अस्ताव्यस्त केले आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती आनंदनगर पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी तातडीने घटनास्थळी तपासासाठी एक आणि अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी दुसरे, अशी दोन स्वतंत्र पथके तयार करून रवाना केली.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस अंमलदार आणि बीट अंमलदारांनी घराची बारकाईने पाहणी केली. महेंद्रसिंग राजपूत यांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी घरातील प्रत्येक वस्तूची काळजीपूर्वक तपासणी केली. पोलिसांनी आपल्या कौशल्याचा वापर करून कपाटातील चोर कप्प्याचा शोध घेतला असता, चोरीस गेल्याचे सांगितलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने त्याच चोर कप्प्यात सुरक्षित आढळून आले.

त्यानंतर सदर दागिने महेंद्रसिंग राजपूत यांचे नातेवाईक श्रावण बुद्धाराम जांगिड (रा. भगवान बाबा नगर, एमआयडीसी, धाराशिव) यांच्या ताब्यात सविस्तर ताबा पावती करून देण्यात आले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशानुसार बीट अंमलदार पोहेकॉ अझर काझी, पोहेकॉ अत्तार, पोअ टिकोरे, पोअ गिराम, पोअ मसाळ, चालक पोहेकॉ शेख आणि होमगार्ड गुरफुळे यांनी पार पाडली.

दिवाळीच्या सणासुदीच्या काळात बंद घरांना लक्ष्य करण्याचा चोरट्यांचा डाव असताना आनंदनगर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तपासातील बारकाई कौतुकास्पद ठरली आहे. विशेष म्हणजे, माहिती मिळताच तातडीने पथके रवाना करून पोलिसांनी संपूर्ण प्रकार उघडकीस आणल्याने नागरिकांमधून पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर आणि त्यांच्या पथकाचे कौतुक होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

नाल्याच्या बांधकामात काळ्या मातीवरच थेट काँक्रिटीकरण!

Next Post

येडशी गावात अग्नितांडव! दुकानाला लागलेल्या आगीने शेजारील घरही भक्ष्यस्थानी;

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेचा गांजा तस्करांना दणका!
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेचा गांजा तस्करांना दणका!

November 10, 2026
कळंब पत्नीच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद
क्राईम

कळंब पत्नीच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद

November 3, 2026
सुकटा मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद
क्राईम

सुकटा मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

October 21, 2026
धाराशिव LCB ची धडाकेबाज कारवाई
क्राईम

धाराशिव LCB ची धडाकेबाज कारवाई

October 19, 2026
परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
Next Post
येडशी गावात अग्नितांडव! दुकानाला लागलेल्या आगीने शेजारील घरही भक्ष्यस्थानी;

येडशी गावात अग्नितांडव! दुकानाला लागलेल्या आगीने शेजारील घरही भक्ष्यस्थानी;

ताज्या घडामोडी

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

November 20, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!