• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नाल्याच्या बांधकामात काळ्या मातीवरच थेट काँक्रिटीकरण!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
November 6, 2026
in महाराष्ट्र
0
नाल्याच्या बांधकामात काळ्या मातीवरच थेट काँक्रिटीकरण!
0
SHARES
188
VIEWS

सांजा रोडचे काम अखेर सुरू; मात्र नाल्याच्या बांधकामात काळ्या मातीवरच थेट काँक्रिटीकरण व निकृष्ट दर्जाचा आरोप! अधिकाऱ्यांच्या देखरेखीअभावी ठेकेदाराची मनमानी?

धाराशिव | लोकविचार

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक या सांजा रोडच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र अनेक वर्षांपासून खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असतानाच सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेषतः बसस्थानक परिसरातील सांजा रोड येथे नाल्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, निविदेतील अटी व तांत्रिक निकषांनुसार काम केले जात नसल्याची चर्चा आहे.

सांजा रोडवरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. शहराबाहेरील अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. याच मार्गावरून लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारीही नियमित प्रवास करतात. त्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेची आणि नागरिकांच्या हालअपेष्टांची त्यांना पूर्ण कल्पना असतानाही कामाला अपेक्षित गती मिळण्यासाठी एवढा विलंब का झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अखेर रस्त्याचे काम संथ गतीने सुरु झाले असले तरी बसस्थानक परिसरातील नाल्याच्या बांधकामाने नवाच वाद निर्माण केला आहे. प्रत्यक्ष बांधकामाचा दर्जा मात्र संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संबंधित ठिकाणी संपूर्ण काळी माती असल्याचे दिसत असतानाही नाल्याचे खोदकाम पोकलेनच्या साहाय्याने करण्यात येत आहे. अशा ठिकाणी नियमानुसार तळाची योग्य तयारी करून सोलिंग व आवश्यक दगडी भराव करून त्यावर काँक्रिटीकरण करणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात काळ्या मातीवरच थेट काँक्रिटीकरण केले जात असल्याचा आरोप होत आहे.

काळ्या मातीची जमीन पावसाळ्यात फुगणे, खचणे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे बांधकामाला (काँक्रिट) तडे जाणे अशा समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे आवश्यक तांत्रिक प्रक्रिया न करता नाल्याचे बांधकाम केले जात असेल, तर भविष्यात हे बांधकाम टिकणार किती काळ, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज मोठ्या गाजावाजात काम सुरू करून उद्या पुन्हा नाला खचला किंवा फुटला, तर शासनाच्या  पैशांचा अपव्यय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे या नाल्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस लाईन, पोलीस अधीक्षक कार्यालय, समर्थ नगर बसस्थानक अशा महत्त्वाच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होणार आहे. त्यामुळे या नाल्याची क्षमता, बांधकामाची मजबुती आणि तांत्रिक दर्जा अत्यंत महत्त्वाचा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याचे काम जर काळ्या मातीवरच काँक्रिटीकरण करून केले जात असेल, तर भविष्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर या बांधकामाची अवस्था काय होणार, हा चिंतेचा विषय बनला आहे.

आणखी गंभीर बाब म्हणजे काम सुरू असताना संबंधित विभागाचे अभियंता किंवा जबाबदार अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. अधिकाऱ्यांच्या देखरेखीअभावी ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोपही होत आहे. निविदेतील अटी, तांत्रिक निकष आणि बांधकामाच्या निर्धारित पद्धतीनुसार काम होत आहे की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असताना त्यांचे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सांजा रोडच्या दुरवस्थेबाबत यापूर्वीही नागरिकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. आता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कामाला सुरुवात झाली असताना त्यामध्येही निकृष्ट दर्जाच्या कामाचे आरोप होत असतील, तर नागरिकांनी नेमका कोणावर विश्वास ठेवायचा? रस्त्याचे काम केवळ पूर्ण झाल्याचे दाखविण्यापेक्षा ते टिकाऊ आणि दर्जेदार होणे अधिक महत्त्वाचे आहे. अन्यथा पुन्हा काही महिन्यांतच खड्डे, नाला खचणे आणि दुरुस्तीच्या कामांचा सिलसिला सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित नाल्याच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करावी, तांत्रिक तपासणी करून काम निविदेतील अटींनुसारच सुरू असल्याची खात्री करावी. आवश्यक त्या ठिकाणी काम थांबवून योग्य पद्धतीने बांधकाम करण्याचे आदेश द्यावेत तसेच जबाबदार अभियंत्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखालीच काम पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सांजा रोडचे काम सुरू झाले, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे; मात्र कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर विकासकामांचा उपयोग काय? रस्ता आणि नाला दोन्ही दर्जेदार झाले पाहिजेत, अन्यथा जनतेच्या पैशातून पुन्हा एकदा ‘पहिले पाढे पंचावन्न’ होण्याची वेळ येऊ नये, एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनिकृष्ट बांधकाम
Previous Post

महिला प्रवाशांना एसटीचा मोठा दिलासा

Next Post

दिवाळीच्या सुट्टीत बंद घराला चोरट्यांचा डाव;

Related Posts

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;
महाराष्ट्र

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा
महाराष्ट्र

दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा

November 17, 2026
एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!
महाराष्ट्र

एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!

November 16, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

November 16, 2026
तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा
महाराष्ट्र

तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा

November 16, 2026
अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस
महाराष्ट्र

अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस

November 16, 2026
Next Post
दिवाळीच्या सुट्टीत बंद घराला चोरट्यांचा डाव;

दिवाळीच्या सुट्टीत बंद घराला चोरट्यांचा डाव;

ताज्या घडामोडी

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

November 20, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!