• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 9, 2026
in क्राईम
0
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
0
SHARES
0
VIEWS

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत; तपासाला गती, महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

बीड जिल्ह्यातील केज येथून रेवण सोपान नखाते याला अटक; नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा अद्याप कारागृहातच

धाराशिव | लोकविचार

कळंब येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले असून, बीड जिल्ह्यातील केज येथून रेवण सोपान नखाते या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या गुन्ह्यात सात आरोपींना अटक करण्यात आली होती. आता आठवा आरोपी निष्पन्न होऊन पोलिसांच्या ताब्यात आल्याने या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे. ड्रग्ज तस्करीच्या सिंडिकेटचे धागेदोरे हळूहळू समोर येत असले, तरी या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळंब शहरातील ड्रग्ज विक्री आणि व्यसनाधीनतेचा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले जात आहे. शेजारील बीड, केज, परभणी आणि पुणे या भागांपर्यंत या सिंडिकेटचे जाळे पसरल्याची माहिती असून, या प्रकरणात काही स्थानिक नेत्यांचे पाठबळ आणि राजाश्रय असल्याचा आरोपही केला जात आहे. या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धाराशिवचे पोलीस अधीक्षक रितू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख तपास करीत आहेत. या प्रकरणात निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे, लखन गायकवाड, अक्षय रिटे, नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा, सुशांत सुतार आणि सागर किसन गराडे (रा. जांभुळगाव, ता. मावळ, जि. पुणे) या सात आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. हे आरोपी कारागृहात आहेत. पोलिसांकडून बँक खाती, आर्थिक व्यवहार, सीडीआर आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा आणि लखन विजय गायकवाड यांचे नियमित जामीन अर्ज कळंब येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. मंडे यांनी फेटाळले आहेत. सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. महेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली. परभणी येथील गुन्ह्यातही नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा याचा सहभाग आढळून आल्याने तो परभणी कारागृहात आहे, तर अन्य आरोपी धाराशिव कारागृहात आहेत. मोहसीन सलीम मिर्झा अद्यापही कारागृहातच आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून त्याची तत्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी धाराशिवचे पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली होती. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ४ ऑगस्ट रोजी दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर कळंब येथील ड्रग्ज तस्करीचे प्रकरण उघडकीस आले. या कारवाईत ११.२१ ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जच्या २९ पुड्या जप्त करण्यात आल्या होत्या. आरोपींकडून ५५ हजार रुपये किमतीचे ड्रग्ज आणि दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या कारवाईत धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि खटके, कळंब पोलीस ठाण्याचे सपोनि मगर, पोहेकॉ राठोड, पोहेकॉ जानराव, पोहेकॉ गादेकर, पोहेकॉ जाधवर, पोहेकॉ चौरे, पोना जाधवर, पोना ढगारे, पोअं मुंगळे, कळंब पोलीस ठाण्याचे पोहेकॉ शेख, पोहेकॉ माळवे, पोअं बोईनवाड, पोहेकॉ आरब आणि चापोहेकॉ माने यांचा सहभाग होता.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectorLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

Related Posts

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;
क्राईम

बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;

September 24, 2026

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!