• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 9, 2026
in कृषी
0
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक
0
SHARES
0
VIEWS

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

पाणी,चारा,जलसंधारणासह मानसिक आधारासाठीही पुढाकार घ्या ; सेवाभावी संस्थांना आवाहन

दुष्काळ निवारणासाठी प्रशासन आणि सेवाभावी संस्थांचा समन्वय
जिल्हास्तरासह तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष
गावपातळीवर नोडल अधिकारी

धाराशिव लोकविचार

दुष्काळाचे संकट हे केवळ एका शेतकऱ्याचे,एका गावाचे किंवा एका विभागाचे नसून संपूर्ण समाजासमोरील आव्हान आहे.या संकटाचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहेच,मात्र समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या क्षमतेनुसार मदतीचा हात पुढे केला,तर दुष्काळाच्या झळा निश्चितच कमी करता येतील. जिल्ह्यात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थांकडे अनुभव,मनुष्यबळ आणि संसाधने उपलब्ध आहेत.या सर्व शक्ती एकत्र आल्यास बाहेरील मदतीवर पूर्णपणे अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.त्यामुळे ज्या संस्थेला ज्या क्षेत्रात काम करण्याची क्षमता आहे,त्या क्षेत्रात त्यांनी पुढाकार घ्यावा.दुष्काळाच्या काळात एकमेकांना मदत करण्याची तयारी आणि सामूहिक जबाबदारीची भावना अत्यंत आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. प्रियंवदा महाडदळकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संकट मोठे असले तरी एकजुटीची ताकद त्याहून मोठी
जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती,पिण्याचे पाणी,पशुधनासाठी चारा आणि ग्रामीण जीवनमानावर परिणाम होत आहे.अशा परिस्थितीत केवळ शासकीय उपाययोजनांवर अवलंबून न राहता समाजातील विविध संस्था,संघटना,उद्योग, बँका आणि नागरिकांनीही आपल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे.प्रत्येक सेवाभावी संस्था वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत आहे.काही संस्थांना जलसंधारणाचा अनुभव आहे,काही संस्था पशुधन संवर्धनासाठी काम करतात,तर काही संस्था आरोग्य,शिक्षण,महिला सक्षमीकरण आणि समुपदेशनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.या सर्व संस्थांच्या कार्याचा समन्वय साधून गरजेनुसार त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील.

ज्या भागात एखादी संस्था काम करीत आहे,त्या भागात इतर संस्थांकडून कोणत्या स्वरूपाचे सहकार्य उपलब्ध होऊ शकते,याचाही विचार करावा.उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून कामांची पुनरावृत्ती टाळणे आणि मदत प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे,भूजल पातळी वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी जलतारा तसेच पावसाचे पाणी साठविण्याच्या उपक्रमांना परवानगी देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.ज्या क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल,त्या क्षेत्रात काम करण्याची तयारीही संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि उपयुक्त वस्तू तयार करणे,पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे,गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच गायरान जमिनीवर चारा लागवडीसाठी परवानगी देणे,अशा विविध उपक्रमांबाबतही सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी सूचना मांडल्या.

दुष्काळाच्या काळात माणसांबरोबरच पशुपक्ष्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे.पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या जनावरांना आणि पक्ष्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हीदेखील महत्त्वाची सामाजिक जबाबदारी असल्याची भावना या चर्चेतून व्यक्त झाली

बायफ संस्थेच्या प्रतिनिधींनी पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देणे,उपलब्ध चाऱ्यावर आवश्यक प्रक्रिया करून त्याचा उपयोग वाढविणे,पशुपालकांना मार्गदर्शन करणे तसेच पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी काम करण्याबाबत चर्चा केली.महिलांना शेतीपूरक उपक्रमांसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे,गरजू आणि दुष्काळामुळे प्रभावित कुटुंबांना उपजीविकेच्या दृष्टीने प्रशिक्षण देणे,तसेच विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याच्या उपाययोजनांबाबतही चर्चा झाली.

दुष्काळ निवारणासाठी उपलब्ध कामे शक्य तितक्या प्रमाणात लोकसहभागातून आणि संबंधित सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला.

दुष्काळाशी सामना करण्यासाठी माणुसकीची साथ महत्त्वाची
दुष्काळाच्या काळात एखाद्या शेतकऱ्याला आपल्या जनावरांसाठी चारा मिळणे, एखाद्या कुटुंबाला पिण्याचे पाणी उपलब्ध होणे,गावातील विहिरीचे पुनर्भरण होणे किंवा चिंताग्रस्त शेतकऱ्याला मानसिक आधार मिळणे,या प्रत्येक मदतीमागे माणुसकीचा मोठा अर्थ दडलेला आहे.असे श्री.पुजार यावेळी म्हणाले.

प्रत्येक गावासाठी नोडल अधिकारी ; जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावपातळीवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री.विद्याचरण कडवकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून तालुकास्तरावरही स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यवस्थेमुळे गावपातळीवरील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती,चाऱ्याची उपलब्धता,नागरिकांच्या अडचणी आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती प्रशासनाला वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.तसेच सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या मदतीचे योग्य नियोजन आणि समन्वय साधणेही सुलभ होणार आहे.

दुष्काळ निवारण म्हणजे केवळ जलसंधारणाची कामे किंवा मदतीचे वाटप नव्हे,तर संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण एकटे नाही,हा विश्वास देणेही तितकेच आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी याच भावनेतून सेवाभावी संस्थांना एकत्र येण्याचे आवाहन केले.प्रत्येक संस्थेने आपल्या अनुभवाचा,उपलब्ध मनुष्यबळाचा आणि संसाधनांचा समाजहितासाठी उपयोग करावा.असे श्री.कडवकर म्हणाले.

सेवाभावी संस्थांना आपली माहिती द्यायची असल्यास तसेच तसेच सूचना करावयाच्या असल्यास खालील इ-मेलवर कराव्यात. संपर्कासाठी खालील नंबरवर Rdc1osmanabad@gmail.com
संजय पवार (9623001906)
एच.डी.क्षीरसागर (9970863043) संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

शेवटी श्री.पुजार म्हणाले की,ज्या ठिकाणी ज्या स्वरूपाच्या मदतीची गरज आहे,त्या ठिकाणी संबंधित संस्थेने पुढाकार घ्यावा. एकमेकांच्या कामाला पूरक सहकार्य करून दुष्काळ निवारणाच्या प्रयत्नांना अधिक बळ द्यावे,असे त्यांनी सांगितले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectorआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

Related Posts

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर
कृषी

पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

September 17, 2026

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!