• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 26, 2026
in कृषी
0
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
0
SHARES
39
VIEWS

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

गतवर्षीची अतिवृष्टीची जाहीर केलेली मदत का दिली नाही ?

धाराशिव लोकविचार

यंदा महाराष्ट्रात पाऊस नसल्यामुळे अबूतपूर्व दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांची सर्व पिके वाया गेलेले आहेत. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून काही ठिकाणी पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवावे लागत आहे. ही स्थिती फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात आहे. मात्र, कर्नाटक सरकारने मागील आठवड्यातच दुष्काळ जाहीर केला आहे. तर महाराष्ट्रात आज ७५ टक्के भागात दुष्काळ जाहीर झाला आहे.

जाहीर केलेल्या दुष्काळात शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्यांना काय मिळणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन सविस्तरपणे सांगणे आवश्यक आहे. दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार असल्यामुळे या दुष्काळ निवारणासाठी पीएम केअर फंड वापरण्यात यावा अशी मागणी युवा सेनेचे प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी दि.२६ सप्टेंबर रोजी केली. दरम्यान, जे पक्ष सोडून जात आहेत. त्यांना राजकारण करायचे आहे, त्यांना पळवाट काढू द्या, आम्ही जमिनीवर आहोत असा सनसनाटी टोला नाव न घेता खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना लगावला.

दुष्काळामुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाले असून नदी नाले व तलाव कोरडे ठाक पडले आहेत. या विदारक दाहक परिस्थितीची आ ठाकरे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसमवेत पाहणी केली. तर फडातच शेतकऱ्यांसमवेत भारतीय बैठक मारून त्यांच्याशी संवाद साधत पीक परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर ओढवलेल्या आणि कोसळलेल्या नैसर्गिक संकटाच्या व्यथा आणि अडचणी त्यांनी अस्थिवायिकपणे जाणून घेतल्या.

आ ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथील शेतकरी मल्लिनाथ बनसोडे व राजू दासरी आणि लोहारा तालुक्यातील आष्टा मोड येथील शेतकरी यांच्या शेतातील अनुक्रमे सोयाबीन, रोटर केलेल्या उसाची आणि उडीद या पिकाची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी दुष्काळाच्या झळा बसलेल्या पुरुष व महिला शेतकऱ्यांना शाब्दिक, मानसिक, आपुलकीचा धीर आणि आधार दिला.

यावेळी माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, धाराशिव जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे, आमदार प्रवीण स्वामी, महिला जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, कमलाकर चव्हाण, जिल्हा संघटक राज अहमद पठाण, संजय निंबाळकर, रामभाऊ पडवळ, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कानडे, पंचायत समिती सदस्य जयश्री कोळेकर, अश्विनी कोळेकर, श्याम पवार, सुधीर कदम, रोहीत पवार, चेतन बंडगर, जगन्नाथ गवळी, मारुती गायकवाड, विलास गायकवाड, अतुल सलगरे, धुळप्पा रक्षे, बालाजी पांचाळ, शेकाप्पा धुते, बाळासाहेब वाघमोरे, विजय माशाळकर, हरिभाऊ लकडे, जनार्दन लकडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार ठाकरे म्हणाली की, हा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतामध्ये येऊन प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे याची पाहणी केली नाही. हा दुष्काळ सॅटेलाईट फोटोद्वारे जाहीर केला असून सॅटेलाईटद्वारे शेतात असलेले पीक हिरवे टिपलेले आहे. मात्र, त्या पिकाला एकही दाणा नाही हे त्या चित्रांमध्ये आलेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय झाला आहे. विशेष म्हणजे आज जाहीर झालेल्या दुष्काळामध्ये पीक विम्याच्या चार ट्रिगरचा समावेश करणे अपेक्षित होते. मात्र सरकारने एक ट्रिगर लावून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

सरकार एकीकडे कर्जमाफी केली म्हणून सांगत आहे त्या कर्जमाफीच्या याद्या देखील गावागावात डकविलेल्या आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांची नावे त्या यादीमध्ये असताना देखील त्यांची कर्जमाफी होत नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना संबंधित बँकांनी कर्ज चुलीच्या नोटीसा पाठविले असून संध्याकाळी नऊ साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान फोन केले जात असल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. त्यामुळे सरकारने कुठल्याही अटीविना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि बँकांना कर्ज वसुली करण्याच्या शेतकऱ्यांना नोटीशी पाठवू नयेत तसेच कर्ज वसुली तात्काळ थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बँकांवर वचक दाखवावा, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारने आज जाहीर केलेल्या दुष्काळाच्या योजनेची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. त्याबरोबरच स्वयंसेवी संस्था यांनी देखील या परिस्थितीमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. सरकारने जाहीर केलेली मदत संबंधित लाभार्थ्यांना मिळावी यासाठी शिवसेना प्रत्येक तालुक्यात मदत केंद्र सुरू करणार असल्याचे ठाम आश्वासन त्यांनी दिले. विशेष म्हणजे वातावरणीय बदल होत असून याबाबत आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने बोलत आहोत.

जंगलतोड, शेतीत केले जाणारे बदल व इतर कारणामुळे कधी अतिवृष्टी कधी दुष्काळ आणि अशी नैसर्गिक संकटे कोसळत आहेत आहेत. त्यामुळे यावर सर्वांनी विचार करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आ. ठाकरे यांनी व्यक्त केली.यावेळी खानापूर व आष्टामोड या दोन्ही ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

Next Post

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार सलीम पठाण यांना जाहीर

Related Posts

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर
कृषी

पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

September 17, 2026
खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू;
कृषी

खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू;

September 5, 2026
Next Post
पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार सलीम पठाण यांना जाहीर

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार सलीम पठाण यांना जाहीर

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!