• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

हायवेवरील चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या २४ तासांत जप्त स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 24, 2026
in क्राईम
0
हायवेवरील चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या २४ तासांत जप्त स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
0
SHARES
306
VIEWS

हायवेवरील चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या २४ तासांत जप्त स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

३ लाख १९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

धाराशिव लोकविचार

पोलीस ठाणे येरमाळा हद्दीत हायवेवरून जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून चोरट्यांनी मेंढ्या चोरून नेल्याची घटना २३ मे २०२६ रोजी पहाटे घडली होती. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन लाख ९ हजार रुपये किमतीच्या मेंढ्या जप्त केल्या असून टमटम वाहनासह एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी तपासाची सूत्रे हलवली. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक,आरसीबी पथक क्रमांक १ व क्यूआरटी पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले.

पोलीस पथक येरमाळा हद्दीतील हायवेवरील ब्रिज परिसरात तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी व उमरा पारधी पिढी येथील काही इसमांनी पहाटे चालत्या ट्रकमधून मेंढ्या चोरून आणल्या असून त्या उमरा पिढीजवळील बाभळीच्या झाडाखाली उभ्या असलेल्या लाल रंगाच्या टमटममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस ठाणे येरमाळा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल संतोष तिघाडे व संदीप चौगुले यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे पथक तेथे पोहोचताच एक संशयित इसम पळून गेला. त्याचा पाठलाग करण्यात आला मात्र तो अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.यानंतर पोलिसांनी टमटमची झडती घेतली असता त्यामध्ये चोरीस गेलेल्या मेंढ्या आढळून आल्या. फिर्यादीला घटनास्थळी बोलावून मेंढ्यांचे वर्णन विचारण्यात आले असता त्या ट्रकमधून चोरीस गेलेल्या मेंढ्याच असल्याची खात्री झाली.पोलिसांनी मेंढ्या व टमटम वाहन असा एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे येरमाळा येथे जमा केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, स.पो.नि. सचिन खटके, स. पो.नि. तात्याराव लहाने, पो.ह. विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, म.पो.ह. शोभा बांगर, पो.ना. संतोष तिघाडे, संदीप चौगुले, रोहित दंडनाईक तसेच आरसीबी पथक क्रमांक १ व क्यूआरटी पथकाने पार पाडली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव पोलिसलोकविचार
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेकरिता अ‍ॅड. व्यंकटराव गुंड पाटील यांची पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी

Next Post

एसपी अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर पोलिसांचा छापा; ५० लाखांहून अधिक साहित्य जप्त

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
एसपी अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर पोलिसांचा छापा; ५० लाखांहून अधिक साहित्य जप्त

एसपी अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर पोलिसांचा छापा; ५० लाखांहून अधिक साहित्य जप्त

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!