• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 25, 2026
in क्राईम
0
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
0
SHARES
132
VIEWS

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका; २२ जुगारी ताब्यात, १७.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरातील कथित पत्त्यांच्या क्लबवरही आता LCBची नजर; तेरणा कॉलेज परिसरासह बार्शी रोडवरील भागातून कारवाईची मागणी

धाराशिव | लोकविचार

वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा येथील पारधी पिढी परिसरात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री धडक कारवाई करत तब्बल २२ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत २ लाख ४६ हजार ६०० रुपयांची रोकड, १५ मोबाईल, जुगाराचे साहित्य आणि चारचाकी वाहन असा एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे कौतुक होत असतानाच धाराशिव शहरात सुरू असल्याच्या चर्चेत असलेल्या कथित पत्त्यांच्या क्लबकडेही आता पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना मांडवा येथील पारधी पिढी परिसरात मोठ्या प्रमाणात तिरट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर परिसराची संवेदनशीलता लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार, जलद प्रतिसाद पथक तसेच दंगा नियंत्रण पथकाच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला. पोलिस पथक पोहोचताच जुगार अड्ड्यावर धावपळ उडाली; मात्र २२ जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे, कारवाईतील संतोष रमेश काळे (रा. मांडवा) हा १४ चोरीच्या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच अतुल कालिदास काळे (रा. कन्हेरवाडी पाटी) हा वाशी पोलिस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

धाराशिव शहरातील कथित ‘पत्त्यांच्या क्लब’वरही कारवाईची मागणीमांडवा येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने केलेली कारवाई निश्चितच लक्षवेधी ठरली आहे. मात्र धाराशिव शहरातही काही ठिकाणी पत्त्यांचे क्लब सुरू असल्याची कुजबुज नागरिकांमध्ये सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

विशेषतः तुळजापूर रोड येथील तेरणा अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग कॉलेज )महाविद्यालय परिसर तसेच बार्शी रोड परिसरातील काही भागांमध्ये अशा प्रकारचे क्लब सुरू असल्याची चर्चा असल्याने पोलिसांनी या माहितीची खातरजमा करावी, अशी मागणी होत आहे.

धाराशिव हे शैक्षणिक केंद्र असल्याने जिल्ह्यासह इतर जिल्हे, राज्य आणि देशाच्या विविध भागांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. अशा परिस्थितीत त्यांच्या आसपास बेकायदेशीर जुगाराचे अड्डे किंवा पत्त्यांचे क्लब सुरू असल्यास त्याचा परिसरातील सामाजिक वातावरणावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता नागरिक व्यक्त करीत आहेत.

मात्र संबंधित ठिकाणी नेमके जुगाराचे क्लब सुरू आहेत का, याची पोलिसांकडून स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे.काही ठिकाणी क्लब चालकांच्या कथित दबावामुळे किंवा भीतीमुळे नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचीही चर्चा आहे.

त्यामुळे केवळ तक्रारीची वाट न पाहता पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अशा ठिकाणांची वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी शहरातून होत आहे.

LCBकडून खातरजमा करून कारवाई होणार का?

मांडवा येथील कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने ज्या पद्धतीने माहिती मिळवून नियोजनबद्ध छापा टाकला, त्याच धर्तीवर धाराशिव शहरातील पत्त्यांच्या क्लबबाबत होत असलेल्या चर्चेचीही खातरजमा करण्याची मागणी होत आहे. जर तपासात जुगार सुरू असल्याचे आढळले, तर संबंधित ठिकाणी कायद्यानुसार कारवाई करून असे अड्डे बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या कारवाईमुळे अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये धडकी भरली असून, स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील कथित जुगार अड्ड्यांवरही अशीच धडक मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन खटके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी-अंमलदार, आरसीपी व क्यूआरटी पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

मांडव्यातील कारवाईनंतर आता धाराशिव शहरातील कथित पत्त्यांच्या क्लबचीही पोलिसांकडून खातरजमा होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

तीन वर्षांचा कार्यकाळ संपूनही बस स्थानक प्रमुख कायम;

Next Post

गणेश भक्तांच्या विनंतीला प्रतिसाद

Related Posts

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;
क्राईम

बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;

September 24, 2026
पिस्टल-काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद
क्राईम

पिस्टल-काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद

September 22, 2026
Next Post
गणेश भक्तांच्या विनंतीला प्रतिसाद

गणेश भक्तांच्या विनंतीला प्रतिसाद

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!