• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

गणेश भक्तांच्या विनंतीला प्रतिसाद

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 26, 2026
in महाराष्ट्र
0
गणेश भक्तांच्या विनंतीला प्रतिसाद
0
SHARES
141
VIEWS

१२ वाजता वाद्ये बंद; गणेश भक्तांच्या विनंतीला प्रतिसाद—नियम पाळत कलाविष्कारासाठी वेळ वाढवला!

गणेश मंडळांची शिवसेना नेते सोमनाथ गुरवांकडे विनंती; गुरवांची खासदार ओमराजेंकडे धाव, ओमराजेंच्या विनंतीला पोलीस अधीक्षकांचा प्रतिसाद; वेळ वाढवताच गणेश मंडळांकडून सर्वांचे आभार

धाराशिव | लोकविचार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री १२ वाजता वाद्ये बंद करण्याच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत धाराशिव शहरातील सर्व गणेश मंडळांनी डीजे-डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांसह गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडल्या. विशेष म्हणजे, यंदाच्या मिरवणुकीत शहरात एकाही मंडळाकडून डीजे वाजविण्यात आला नाही.

काळा मारुती चौक येथे शिवसेनेच्या वतीने गणेश मंडळांच्या स्वागतासाठी स्टेज उभारण्यात आले होते. या ठिकाणी विविध मंडळांनी सामाजिक व प्रबोधनात्मक देखावे, लेझीम, झांज पथक, ढोल पथक, आदींच्या माध्यमातून कलाविष्कार सादर केला. दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांवरील आसमानी संकट आणि सामाजिक विषयांवरही मंडळांनी देखावे सादर केले.

दरम्यान, आदर्श तरुण गणेश मंडळ, इंगळे गल्लीचे पथक काळा मारुती चौकात आल्यानंतर वेळेचे कारण देत पोलिसांनी वाद्ये बंद करण्यास सांगितले. या मंडळातील लहान मुले, मुली व महिलांनी तब्बल एक ते दीड महिना सराव केला होता. त्यामुळे आपली कला सादर करण्यासाठी किमान काही मिनिटांचा वेळ मिळावा, अशी विनंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना माजी शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांच्याकडे केली.

गणेश मंडळांची विनंती लक्षात घेऊन शिवसेना सहसंपर्कप्रमुख सूरज साळुंखे, सनी डोके यांच्यासह सोमनाथ गुरव यांनी पोलीस प्रशासनाकडे वेळ वाढवून देण्याची विनंती केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असल्याने नियमांचे पालन आवश्यक असल्याची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली.

त्यानंतर सोमनाथ गुरव यांनी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याकडे संपूर्ण परिस्थिती मांडली. गणेश मंडळांनी डीजे-डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांद्वारे मिरवणूक काढली आहे. लहान मुले, महिला व मुलींनी दीड महिन्यापासून केलेला सराव, तसेच सामाजिक विषयांवरील देखावे सादर करण्यासाठी त्यांना संधी मिळावी, यासाठी प्रत्येक मंडळाला किमान पाच मिनिटांचा वेळ देण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली.

खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी गणेश भक्तांच्या भावना आणि मंडळांनी केलेल्या सामाजिक व सांस्कृतिक तयारीचा विचार करून क्षणाचाही विचार न करता पोलीस अधीक्षकांकडे वेळ वाढवून देण्याची विनंती केली. पोलीस प्रशासनानेही नियमांची अंमलबजावणी कायम ठेवत परिस्थितीचा विचार करून गणेश मंडळांना कलाविष्कार सादर करण्यासाठी मर्यादित अतिरिक्त वेळ देण्यास मान्यता दिली.

वेळ वाढवून दिल्याची माहिती मिळताच गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मंडळांनी लेझीम, झांज, ढोल पथक तसेच विविध सामाजिक देखावे सादर केले. अखेर गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. गणेश भक्तांनी सहकार्य करणारे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, सोमनाथ गुरव तसेच पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

नियमांचे पालन करत मिरवणूक शांततेत पार पाडणे आणि गणेश मंडळांच्या कलाविष्कारालाही योग्य संधी देणे, यामुळे धाराशिव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सामाजिक व सांस्कृतिक स्वरूप लाभले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectorganeshotsawLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

Next Post

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!