• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तीन वर्षांचा कार्यकाळ संपूनही बस स्थानक प्रमुख कायम;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 25, 2026
in महाराष्ट्र
0
तीन वर्षांचा कार्यकाळ संपूनही बस स्थानक प्रमुख कायम;
0
SHARES
107
VIEWS

तीन वर्षांचा कार्यकाळ संपूनही बस स्थानक प्रमुख कायम; कळंबहून ये-जा, कार्यालयबाहेर नाव-दूरध्वनी क्रमांकाची प्लेटही नाही!

धाराशिव बसस्थानकाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; वरिष्ठ अधिकारी आतातरी ‘उचल बांगडी’ करणार का?

धाराशिव | लोकविचार 

धाराशिव मध्यवर्ती बसस्थानक प्रमुख मुकेश कोमटवार यांच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची नियमानुसार दर तीन वर्षांत बदली होणे अपेक्षित असताना जुलै २०२३ पासून स्थानक प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या कोमटवार यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही ते याच पदावर (ठिकाणी) कायम आहेत. त्यातच स्थानक प्रमुखांनी मुख्यालयी उपलब्ध राहणे अपेक्षित असताना ते दररोज कळंब-धाराशिव असा प्रवास करीत असल्याच्या तक्रारी कर्मचारी व प्रवासी वर्गातून होत आहेत.

बसस्थानकासारख्या प्रवासी वर्ग २४ तास कार्यरत असलेल्या ठिकाणी चोरी, पाकीटमारी, हाणामारी, बस अपघात अथवा अन्य अनुचित घटना घडल्यास स्थानक प्रमुख म्हणून तातडीने घटनास्थळी उपस्थित राहणे आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे अपेक्षित असते. मात्र अधिकारी मुख्यालयापासून दूर राहत असल्यास रात्री-अपरात्री घडणाऱ्या घटनांची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, बसस्थानकातील चौकशी कक्ष किंवा संबंधित कार्यालयाच्या दर्शनी भागात अधिकाऱ्यांचे नाव व दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देणे अपेक्षित असतानाही धाराशिव बसस्थानकात संबंधित माहिती स्पष्टपणे दिसत नसल्याचा आरोप आहे. स्थानक प्रमुखांसाठी कार्यालय असतानाही त्या कार्यालयाबाहेर त्यांचे नाव व संपर्क क्रमांकाची प्लेट नसल्याने प्रवाशांना तातडीच्या वेळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अलीकडेच धाराशिव बसस्थानकात पोलिस कर्मचाऱ्याच्याच खिशातील पाकीट चोरीला गेल्याने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानक प्रमुखांची उपलब्धता, सुरक्षारक्षकांची कार्यक्षमता, सीसीटीव्ही व्यवस्था आणि संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे तपासणी करण्याची गरज आहे.

जिल्ह्याच्या मुख्यालयातील मध्यवर्ती बसस्थानकातच असा कारभार सुरू असेल, तर वरिष्ठ अधिकारी आता गांभीर्याने दखल घेऊन सक्षम स्थानक प्रमुखाची नियुक्ती करणार का? याकडे धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.

प्रवाशांची गर्दी; सुरक्षारक्षक मात्र मोबाईलमध्ये व्यस्त!

धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असताना एका खाजगी कंपनीमार्फत तैनात करण्यात आलेले महिला सुरक्षारक्षक प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याऐवजी खुर्चीवर निवांत बसून मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे छायाचित्र समोर आले आहे. बसमध्ये चढताना-उतरताना प्रवाशांची मोठी वर्दळ असताना सुरक्षारक्षक अशा पद्धतीने एका कोपऱ्यात बसून राहणार असतील, तर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.

बसस्थानकात चोरी, पाकीटमारी, भांडण अथवा अन्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाते. मात्र प्रत्यक्षात सुरक्षारक्षकच प्रवाशांच्या गर्दीपासून दूर बसून मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसत असेल, तर त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी कोण? संबंधित सुरक्षा कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर देखरेख करण्याची जबाबदारी कोणाची? याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करणार का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

 क्रमशः

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाची स्वतः व्यवस्था करावी

Next Post

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!