• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाची स्वतः व्यवस्था करावी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 24, 2026
in महाराष्ट्र
0
गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाची स्वतः व्यवस्था करावी
0
SHARES
44
VIEWS

दुष्काळी परिस्थितीतमुळे आवाहन गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाची स्वतः व्यवस्था करावी – मुख्याधिकारी नीता अंधारे 

धाराशिव | लोकविचार

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या गणेशोत्सवात पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने धाराशिव नगरपरिषदेने विसर्जनासाठी विशेष नियोजन केले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाची आपल्या स्तरावर योग्य व्यवस्था करून नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, तर नागरिकांनी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन नगरपरिषदेने उभारलेल्या कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी केले आहे.

गणेश विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नगरपरिषदेने विविध उपाययोजना केल्या आहेत. विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून मार्ग खड्डेमुक्त करण्यात आले असून रात्रीच्या वेळी मिरवणुकीसाठी पुरेशी विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

नगरपरिषदेने गणेश विसर्जनासाठी विसर्जन विहीर आणि हातलाई तलाव अशी दोन प्रमुख ठिकाणे निश्चित केली आहेत. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी ‘घरगुती गणपती विसर्जन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील विविध भागांत सहा टेम्पोच्या माध्यमातून घरगुती गणेशमूर्तींचे संकलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन फिरत्या कृत्रिम तलावात किंवा नगरपरिषदेच्या संकलन केंद्रावर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून विसर्जन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नगरपरिषदेचे सुमारे ७० कर्मचारी विविध ठिकाणी तैनात राहणार आहेत. विसर्जनस्थळी स्वच्छता, सुरक्षा आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था स्वतःच्या स्तरावर करावी आणि नागरिकांनी कृत्रिम तलाव व संकलन केंद्रांचा वापर करावा. पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि पाणी बचतीसाठी धाराशिवकरांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी केले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलगणेश चतुर्थीगणेश विसर्जनधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

Next Post

तीन वर्षांचा कार्यकाळ संपूनही बस स्थानक प्रमुख कायम;

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
तीन वर्षांचा कार्यकाळ संपूनही बस स्थानक प्रमुख कायम;

तीन वर्षांचा कार्यकाळ संपूनही बस स्थानक प्रमुख कायम;

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!