• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 15, 2026
in क्राईम
0
धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा
0
SHARES
212
VIEWS

बायकोने प्रियकराला दिली नवऱ्याच्या खुनाची सुपारी! अवघ्या काही तासांत पोलिसांनी पत्नीसह प्रियकर आणि साथीदारस ठोकल्या बेड्या!

धाराशिव लोकविचार 

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत तत्परता, तांत्रिक तपास आणि समन्वयाच्या बळावर खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ग्रामीण पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून जिल्हाभरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

दि. १३ जुलै २०२६ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुमाळवाडी शिवारात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि हाके, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहळ व त्यांच्या पथकाने तात्काळ धाव घेत पंचनामा व तपास सुरू केला. मृतदेहावरील जखमांवरून हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.

घटनास्थळी उभी असलेल्या मोटारसायकलच्या आधारे पोलिसांनी मृताची ओळख येडशी येथील दगडू देशमुख अशी पटवली. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला.

तपासादरम्यान मृताची पत्नी व एका संशयितामध्ये अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. पुणे पोलिसांच्या सहकार्याने मुख्य संशयित बालाजी महादेव पायथण व त्याचा साथीदार सोमनाथ सातनाक यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनी मृताच्या पत्नीच्या सांगण्यावरून चाकूने वार करून व दगडाने ठेचून दगडू देशमुख यांचा खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणात मृताची पत्नी देवशिला संतोष देशमुख हिलाही अटक करण्यात आली.

या गुन्ह्याचा वेगाने उलगडा करण्यामध्ये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट समन्वय साधत उत्कृष्ट तपासाची प्रचिती दिली. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा कमी वेळेत छडा लावून आरोपींना गजाआड करण्याची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि हाके, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहळ,पो. ह. माचेवाड, खोसे,गाडेकर, ढगारे,घुगे, पो. ना.सावंत, पो. शी.पडवळ, आरसेवार,स्वामी,गवळी, बनाळे, म.पो.हा.शोभा बांगर, सोन्नी तसेच ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadyedashiआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव पोलिस अधीक्षकधाराशिव लोकविचारयेडशी
Previous Post

कळंबमध्ये अनैतिक देहव्यवसायावर पोलिसांचा छापा प्रभात लॉजमधून दोन महिलांची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!