• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 15, 2026
in महाराष्ट्र
0
येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही
0
SHARES
8
VIEWS

येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी; त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

येडशीत ‘वन टाइम वर्क’ अंतर्गत विकासकामांनाही हिरवा कंदील; आमदार राणाजगजितसिंह पाटील व राजाभाऊ राऊत यांच्या पाठपुराव्याला यश

धाराशिव लोकविचार

धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या येडशी–बार्शी–कुर्डुवाडी–टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मोठी गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (DPR) पुढील तीन महिन्यांत मंजुरी देण्यात येईल आणि त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती आमदार तथा एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

दिल्ली येथे बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि राजाभाऊ राऊत यांनी येडशी–बार्शी–कुर्डुवाडी–टेंभुर्णी मार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. या मार्गाच्या DPR ला तातडीने मंजुरी देऊन आवश्यक प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामाला लवकर प्रारंभ करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

निवेदनात धाराशिव जिल्हा हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार असून तुळजाभवानी मंदिरामुळे राज्यातील प्रमुख धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जात असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच आकांक्षित जिल्हा म्हणून विविध विकास प्रकल्पांना वेग मिळत असल्याने दळणवळणाची सक्षम व्यवस्था उभारणे अत्यावश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

टेंभुर्णी–लातूर राष्ट्रीय महामार्ग हा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून टेंभुर्णी, कुर्डुवाडी, बार्शी, धाराशिव आणि लातूर या शहरांमधील वाढती वाहतूक, कृषी आणि औद्योगिक विकास लक्षात घेता चौपदरीकरणाची गरज निर्माण झाली आहे. येडशी–लातूर टप्प्याचे काम सुरू असले तरी उर्वरित टेंभुर्णी–येडशी भागाचेही तातडीने चौपदरीकरण करण्याची आवश्यकता आमदारांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एनएच-५४८-सी अंतर्गत टेंभुर्णी–कुर्डुवाडी–बार्शी–कुसळंब तसेच एनएच-६३ अंतर्गत कुसळंब–येडशी मार्गाच्या चौपदरीकरणासाठीचा DPR पुढील तीन महिन्यांत मंजूर करून त्यानंतर त्वरित निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही दिली.

याशिवाय येडशी येथे ‘वन टाइम इम्प्रूव्हमेंट (One Time Work)’ योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते, नाल्या, स्ट्रीट लाईटसह विविध मूलभूत सुविधांच्या विकासालाही मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्ते राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

या निर्णयामुळे धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित, जलद आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून व्यापार, उद्योग, शेती, धार्मिक पर्यटन आणि एकूणच प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectorआमदार कैलास पाटीलउस्मानाबादतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकबार्शी विधानसभा आमदार राजाभाऊ राऊत
Previous Post

धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा

Next Post

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!