• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

गाडीचा हप्ता भरण्यासाठी पवनचक्की तारेची चोरी स्थानिक गुन्हे शाखेने केली एकास अटक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 22, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) – पैशासाठी वाटेल ते करण्याची तयारी प्रत्येकाची असते. त्यातच मोबाईल टू व्हीलर फोर व्हीलर व चैनीच्या वस्तू खरेदी करण्याची अनेकांना सवय व हौस जडली आहे. त्यासाठी मोठी रक्कम गुंतवण्याची आवश्यकता नाही. पैसा पुरविण्यासाठी फायनान्सर म्हणून अनेक फायनान्सरनी आपली दारे सताड उघडीच ठेवलेली आहेत. त्यासाठी कोणत्याही कागदपत्राची जास्ती डोकेदुखी नसते. मात्र, व्याजाचे दर दसादशे २५ टक्के आकारला जातो. त्याची परतफेड दर महिन्याला असते, ती न केल्यास थेट जप्तीची कारवाई केली जाते. त्यामुळे एकाने वाहनाचे हप्ते फेडण्यासाठी चक्क पवनचक्कीच्या ॲल्युमिनियम तारेची चोरी केली. मात्र तो पोलिसांच्या अलगद जाळ्यात अडकला आहे. त्याला ॲल्युमिनियम ची तार व ती वाहतूक करण्यासाठी असलेल्या पिकअप वाहनासह ७ लाख ६९ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. ही दमदार कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दि.२१ ऑगस्ट रोजी करीत अशा प्रकारच्या चोरीचे सर्व गुन्हे उघडकीस आणले आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथकातील कर्मचारी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना पथकास गोपनीय बातमीवरून संशयित आरोपी भूमच्या पारधी पिढी येथील विशाल रामा काळे (वय २१ वर्ष) याच्याकडे चोरीचा मुद्देमाल असून सदर मुद्देमाल तो विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची बातमी मिळाल्यावर काळेला पिकअपसह सिताफिने ताब्यात घेतले. त्या वाहनाची तपासणी करताना त्याच्या वाहनात अल्युमिनियम तारेचे बंडल दिसून आले. तारेच्या बंडलची त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या ॲल्युमिनियमच्या तारा कळंब व वाशी तालुक्यातील बावी, सरमकुंडी व मस्सा शिवारातून पवनचक्कीच्या खांबांवरून चोरी केल्या असल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी जिल्हा गुन्हे अभिलेख तपासला असता अशा प्रकारच्या चोरीचे ६ गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. त्यावरून तात्काळ पंचनामा करुन एकूण ८९८ मीटर लांबीच्या २ लाख ६९ हजार ४०० रुपये किमतीच्या ॲल्युमिनियमच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन किंमत ५ लाख रुपये असा एकूण ७ लाख ६९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याच्या अन्य साथीदारांची नावे तसेच चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत माहिती दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या ॲल्युमिनियम तारा चोरीचे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. ताब्यात असलेल्या आरोपीने त्याच्या अन्य साथीदारांच्या मदतीने ते गुन्हे केल्याचे कबुली दिल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्टसह वाशी पोलीस ठाण्यात पुढील कारवाई करण्यासाठी हजर केले आहे. ही कामगीरी अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फराहान पठाण, चालक पोलीस अमंलदार रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.

Tags: bhumcrimedharashivmaharashtraosmanabadpawanchakkipolicepolice adhikashaksolarwashiअवैध धंदेक्राईमगृहमंत्री
Previous Post

मालोजी सूर्यवंशी व मनोज देशमुख यांच्या पुढाकाराने सांजा रोड रस्त्यावरील खड्ड्यात खडी टाकण्याचे काम थांबले

Next Post

विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांचे हस्ते  अधिकारी व अमंलदार सत्कार

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांचे हस्ते  अधिकारी व अमंलदार सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!