• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 7, 2026
in कृषी
0
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
0
SHARES
25
VIEWS

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

चार वेळा निवेदने देऊनही प्रशासनाला जाग नाही; पिंपळा (बु.) येथील शेतकऱ्याचा गंभीर आरोप

धाराशिव Lokvichar – लोकविचार

महसूल विभागाच्या कथित गलथान कारभारामुळे एका शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावरून तब्बल २८ गुंठे जमीन कमी झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) येथील शेतकरी गुलाब मेहबूब शेख यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकवेळा निवेदने देऊनही न्याय मिळाला नसल्याने कुटुंबासह आज ७ जुलै २०२६ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

शेतकरी गुलाब शेख यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या गट क्रमांक १४अ आणि १४ब मधून प्रत्यक्षात कोणताही कालवा गेलेला नसतानाही सन २०१३ मधील फेरफार क्रमांक १०८८ च्या आधारे त्यांच्या ७/१२ उताऱ्यावरून २८ गुंठे क्षेत्र कमी करण्यात आले. मात्र, या संपादनाबाबत त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे त्यांच्या शेतातून आजपर्यंत कालवाही गेलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

याप्रकरणी त्यांनी १७ ऑक्टोबर २०२५, ११ डिसेंबर २०२५, १९ जानेवारी २०२६ आणि १२ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी अर्ज दिले. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शेख यांनी आपल्या निवेदनात महसूल विभागाच्या अनेक त्रुटींकडे बोट ठेवले आहे. फेरफार क्रमांक १०८८ मध्ये गट क्रमांक १४अ आणि १४ब असा स्पष्ट उल्लेख नसून केवळ गट क्रमांक १४ असा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपादनाची नोंद एका व्यक्तीच्या नावावरच करण्यात आली असून इतर हक्कधारकांच्या नावावरील क्षेत्राचा विचारच करण्यात आला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याप्रकरणी सरकारी मोजणी करून प्रत्यक्षात कालवा नसल्याचे सिद्ध झाल्यास ७/१२ वरील चुकीची नोंद तात्काळ दुरुस्त करावी आणि कमी करण्यात आलेले २८ गुंठे क्षेत्र पूर्ववत करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून न्यायासाठी महसूल विभागाचे उंबरठे झिजवूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरला नसल्याचे शेख यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर?” असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासन या गंभीर आरोपांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार अमित देशमुखआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर भारतीय जनता पक्ष आई तुळजाभवानी बीजेपी भाजपाउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचार
Previous Post

शिवसेना नेते अमोल जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश तुळजापूर आगाराला मिळाल्या पाच नवीन एसटी बस

Next Post

“‘कधी आहे प्रवेश” जि.प. अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या व्हॉट्सअॅप कमेंटची जोरदार चर्चा, कैलास पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण”

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
मौजे गुळहाळी येथे ‘गोणपाट’ पद्धतीने सोयाबीन बीज उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक
कृषी

मौजे गुळहाळी येथे ‘गोणपाट’ पद्धतीने सोयाबीन बीज उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक

June 5, 2026
Next Post
“‘कधी आहे प्रवेश” जि.प. अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या व्हॉट्सअॅप कमेंटची जोरदार चर्चा, कैलास पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण”

"‘कधी आहे प्रवेश" जि.प. अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या व्हॉट्सअॅप कमेंटची जोरदार चर्चा, कैलास पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण"

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!