• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

66 लाखांचा टेम्पो भर दुपारी बेपत्ता मात्र तब्बल तीन दिवसांनी गुन्हा दाखल, प्रकरणावर संशयाचे सावट!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
April 3, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

66 लाखांचा टेम्पो भर दुपारी बेपत्ता मात्र तब्बल तीन दिवसांनी गुन्हा दाखल, प्रकरणावर संशयाचे सावट!

सुपारीसह वाहन चोरी की बनाव? आनंदनगर पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

धाराशिव लोकमदत न्यूज

शहरातील आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीतून तब्बल 66 लाख 12 हजार 592 रुपयांचा आयशर टेम्पो व कच्च्या सुपारीचा मोठा साठा चोरीस गेल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणातील काही बाबी संशयास्पद ठरत असल्याने सखोल तपासाची गरज व्यक्त होत आहे.
याबाबत फिर्यादी अझहर युनुस शेख (वय 39, रा. खॉजा नगर, आजम चौक, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 29 मार्च 2026 रोजी दुपारी 2 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास संगम हॉटेलसमोर, वरुडा रोड येथे उभा असलेला आयशर कंपनीचा टेम्पो (क्र. एमएच 24 ए.यू. 1404) अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. या वाहनामध्ये 10 टन 75 किलो कच्ची सुपारी (एकूण 155 बॅगा) असा मोठा माल होता. या प्रकरणी दि. 2 एप्रिल 2026 रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मात्र, घटना घडून दोन चार दिवस उलटल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एवढ्या मोठ्या रकमेचा माल चोरीस जाऊनही तक्रार देण्यास विलंब का झाला, याबाबत पोलीस ठाण्यातच खमंग चर्चा सुरू आहे. तसेच संबंधित वाहन चालक स्थानिक रहिवासी असतानाही तो हॉटेलसमोर थांबण्यामागील कारण, तसेच वाहनाचा नेमका प्रवास मार्ग काय होता, याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
दरम्यान, ही घटना प्रत्यक्ष चोरीची आहे की यामध्ये काही वेगळा बनाव आहे, याबाबतही विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. काही जाणकारांच्या मते, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अधिक बाबी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या घटनेत इतर कोणाचा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचाही तपास होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी या प्रकरणात लक्ष घालून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकूणच, या घटनेचा तपास निष्पक्ष व सखोल पद्धतीने होऊन सत्य बाहेर येण्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
भाग दोन….यापुढील अधिक वस्तुनिष्ठ माहितीसह भाग तीन लवकरच….


लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा
Previous Post

धाराशिवमध्ये ‘सुपारी घेऊन जाणारा आयशर टेम्पो’ गायब? पोलिसांची कमालीची गुप्तता! अफवांना उधाण…

Next Post

लोकमदत न्यूजचा दणका! अखेर लोकवस्ती नसलेल्या भागातील बोगस पाईपलाईन उखडण्यास सुरुवात नगराध्यक्षांचे ठेकेदाराला खडे बोल!

Next Post

लोकमदत न्यूजचा दणका! अखेर लोकवस्ती नसलेल्या भागातील बोगस पाईपलाईन उखडण्यास सुरुवात नगराध्यक्षांचे ठेकेदाराला खडे बोल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.