• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

यात्रा मैदानाच्या प्रश्नावर महिलांचा एल्गार मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीची ओटी भरून अनोखे आंदोलन

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 26, 2026
in राजकारण
0
यात्रा मैदानाच्या प्रश्नावर महिलांचा एल्गार मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीची ओटी भरून अनोखे आंदोलन
0
SHARES
26
VIEWS

यात्रा मैदानाच्या प्रश्नावर महिलांचा एल्गार मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीची ओटी भरून अनोखे आंदोलन

तुळजापूर लोकविचार

तुळजापूर येथील प्रलंबित यात्रा मैदानाच्या प्रश्नावर गुरुवारी महिलांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीची प्रतीकात्मक ओटी भरून निषेध व्यक्त केला.

यात्रा मैदानासंदर्भात यापूर्वी अनेक वेळा निवेदने सादर करूनही प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आंदोलनाच्या दिवशीही मुख्याधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने महिलांनी संताप व्यक्त करत त्यांच्या खुर्चीला साडी, चोळी आणि बांगड्या अर्पण करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडून स्पष्ट आणि लेखी आश्वासनाची मागणी केली होती. मात्र, नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रामध्ये कोणताही ठोस निर्णय अथवा समाधानकारक हमी नसल्याचे सांगत महिलांनी ते पत्र स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला अंतिम इशारा देत पुढील तीन दिवस आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या कालावधीत यात्रा मैदानाच्या प्रश्नावर समाधानकारक तोडगा न निघाल्यास सोमवारी पुन्हा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

तुळजापूरमधील यात्रा मैदानाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय स्तरातूनही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते आणि नागरिकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsosmanabadआई तुळजाभवानीआई राजा उदो उदोआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर भारतीय जनता पक्ष आई तुळजाभवानी बीजेपी भाजपाउस्मानाबादतुळजा भवानीतुळजापूरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद तुळजापूरनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेमाता तुळजाभवानी
Previous Post

महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा नाही” या वक्तव्याचा निषेध; संजय इंचे यांच्यावर कठोर कारवाईची राजाभाऊ राऊत यांची मागणी

Next Post

स्मार्ट मीटरच्या सक्तीवर युवासेनेचा आक्रमक पवित्रा; आंदोलनाचा इशारा

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post
स्मार्ट मीटरच्या सक्तीवर युवासेनेचा आक्रमक पवित्रा; आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरच्या सक्तीवर युवासेनेचा आक्रमक पवित्रा; आंदोलनाचा इशारा

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!