• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

११ दिवसांपासून पाणीटंचाई; सत्ताधारी-विरोधकांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा सवाल, सुरज साळुंके यांचा नगरपालिकेत धडक देत आंदोलनाचा इशारा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 21, 2026
in महाराष्ट्र
0
११ दिवसांपासून पाणीटंचाई; सत्ताधारी-विरोधकांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा सवाल, सुरज साळुंके यांचा नगरपालिकेत धडक देत आंदोलनाचा इशारा
0
SHARES
102
VIEWS

११ दिवसांपासून पाणीटंचाई; सत्ताधारी-विरोधकांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा सवाल, सुरज साळुंके यांचा नगरपालिकेत धडक देत आंदोलनाचा धाराशिव

लोकविचार धाराशिव

शहरातील विजय चौक-दर्गा रोड परिसरात मागील ११ ते १२ दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुरज साळुंके यांनी थेट नगरपालिका कार्यालयात धडक देत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत विविध तक्रारी मांडल्या. प्रशासनाने लवकरात लवकर पर्यायी उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.यावेळी बोलताना सुरज साळुंके यांनी शहरातील सध्याच्या पाणीस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना म्हटले की, आम्ही नगरसेवक आणि पाणी पुरवठा सभापती असताना दुष्काळी परिस्थितीत तसेच प्रशासनाच्या काळातही शहराला चार दिवसांतून एकदा सुरळीत पाणीपुरवठा होत होता. दरवर्षी वीजपुरवठ्याचा लपंडाव, पाइपलाइन फुटी यांसारख्या समस्या उद्भवत असतानाही इतकी बिकट परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती. मात्र सध्या शहरातील अनेक भागांना दहा ते बारा दिवसांनी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही ठोस भूमिका घेतली नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरातील जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे आवश्यक असून पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.काही भागांमध्ये स्थानिक पातळीवरील मनमानी कारभारामुळे पाणीपुरवठ्याचे रोटेशन विस्कळीत झाल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.एका

नगरसेवकाच्या घरातील लग्नकार्यामुळे रोटेशन पद्धती मोडून विशिष्ट भागात पाणी सोडण्यात आले होत, त्यामुळे इतर भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.संबंधित प्रकरणाची चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणीही सुरज साळुंके यांनी केली. तसेच शहरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास शिवसेना शैलीत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, विजय चौक-दर्गा रोड परिसरातील नागरिकांनीही पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करत प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींनीही आता सक्रिय होण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

अपूर्ण पाणीपुरवठा योजनेवरून आळणी ग्रामस्थ आक्रमक!

Next Post

तांत्रिक उत्पादनावर आक्षेप; धाराशिवला ९७८ कोटी पीक विमा द्या — आमदार कैलास

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post
तांत्रिक उत्पादनावर आक्षेप; धाराशिवला ९७८ कोटी पीक विमा द्या — आमदार कैलास

तांत्रिक उत्पादनावर आक्षेप; धाराशिवला ९७८ कोटी पीक विमा द्या — आमदार कैलास

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!