• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भांडीसंचासाठी ५०० रुपयांची लाच घेताना दोघे रंगेहात; बार्शीत एसीबीची धडक कारवाई, धाराशिवमध्ये

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 11, 2026
in क्राईम
0
भांडीसंचासाठी ५०० रुपयांची लाच घेताना दोघे रंगेहात; बार्शीत एसीबीची धडक कारवाई, धाराशिवमध्ये
0
SHARES
46
VIEWS

भांडीसंचासाठी ५०० रुपयांची लाच घेताना दोघे रंगेहात; बार्शीत एसीबीची धडक कारवाई, धाराशिवमध्ये मात्र मजुरांची ‘दलालांकडून’ उघड लूट सुरूच?

बार्शी/माढा लोकविचार

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गरजू कामगारांकडून लाच उकळणाऱ्या दलालांवर अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाईचा बडगा उगारला आहे. बांधकाम कामगारांना शासनाकडून मोफत मिळणाऱ्या गृहउपयोगी भांडीसंचासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना दोन खाजगी इसमांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडल्याने बार्शी-माढा परिसरात खळबळ उडाली आहे.

मात्र, याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातही अशाच प्रकारे अनेक दलाल मजुरांची राजरोस लूट करत असल्याचा गंभीर आरोप होत असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत असल्याची संतप्त भावना कामगारांमधून व्यक्त होत आहे.या प्रकरणातील आरोपी विनोद विजय गाडेकर (वय ३७) व दिनेश मनोहर वाघमारे (वय २३), दोघेही भांडी वाटप केंद्र, उपळाई (बु.), ता. माढा येथे ऑपरेटर म्हणून काम पाहत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम कामगार असून त्यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत भांडीसंच मिळवण्यासाठी दि. २७ मार्च २०२६ रोजी अर्ज दाखल केला होता. मात्र लाभ देण्यासाठी आरोपींकडून सुरुवातीला तब्बल १,२०० रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर ५०० रुपयांवर व्यवहार ठरल्यानंतर संबंधित कामगाराने दि. १६ एप्रिल रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.यानंतर एसीबीने शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले.

त्यानुसार सापळा रचण्यात आला. महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयातील कार्यालयात आरोपी विनोद गाडेकर याने तक्रारदारास लाचेची रक्कम दिनेश वाघमारे याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने ५०० रुपये देताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले.या प्रकरणी Prevention of Corruption Act, 1988 अंतर्गत कलम ७(अ) व १२ नुसार माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश पवार व एसीबी सोलापूरच्या पथकाने केली.

दरम्यान, या कारवाईनंतर धाराशिव जिल्ह्यातील कामगारांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक ठिकाणी दलालांनि मजुरांकडून हजारो रुपये उकळले जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

काही ठिकाणी बनावट कागदपत्रे, अपात्र लाभार्थी आणि कमिशनच्या माध्यमातून मोठे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा असून, अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप कामगार यांच्या कडून करण्यात येत आहे.बार्शीतील एसीबीच्या कारवाईमुळे आता धाराशिवमधील अशा दलालांवरही कारवाई होणार का? शासनाच्या योजनांवर डल्ला मारणाऱ्या आणि गरीब मजुरांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांवर प्रशासन कठोर पावले उचलणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजितसिंह पाटीलआमदार राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर भारतीय जनता पक्ष आई तुळजाभवानी बीजेपी भाजपाउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

आरटीओच्या दारात ‘आधार’च बनावट? पोस्टमनपासून कॅम्पपर्यंत संपूर्ण साखळी संशयाच्या भोवऱ्यात!

Next Post

धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत १८ मे रोजी

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत १८ मे रोजी

धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत १८ मे रोजी

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!