• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

सांजा जिल्हा परिषद गटात परंपरेची पुनरावृत्ती – प्रदीप घोणे विक्रमी मताधिक्याने विजयी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 9, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

सांजा जिल्हा परिषद गटात परंपरेची पुनरावृत्ती – प्रदीप घोणे विक्रमी मताधिक्याने विजयी

नगर परिषद नगरसेवक ते जिल्हा परिषद सदस्य — प्रदीप घोणेंचा विजयी योगायोग कायम

धाराशिव लोकमदत न्यूज

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली असून जिल्ह्यातील अनेक गटांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. यामध्ये सांजा जिल्हा परिषद गट विशेष चर्चेचा ठरला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रदीप घोणे यांनी ११७९ विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे.
सांजा जिल्हा परिषद गटाची राजकीय परंपरा पाहता दरवेळी मतदारसंघाबाहेरील उमेदवार विजयी होण्याचा योगायोग कायम राहिला असून यंदाही तीच परंपरा कायम राहिली आहे. याआधी 2017 मध्ये याच गटातून धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील विजयी झाले होते.
यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून धाराशिव शहरातील अनुभवी राजकारणी प्रदीप घोणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. घोणे यांनी याआधी धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत दोन वेळा वेगवेगळ्या प्रभागांतून विजय मिळवला असून त्यांच्या राजकीय अनुभवाचा लाभ या निवडणुकीतही झाला.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने सांजा गटातील स्थानिक उमेदवार देत निवडणूक अतिशय चुरशीची केली होती. भाजपकडून अनेक वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे लढत अत्यंत रंगतदार होईल, असे चित्र सुरुवातीपासून दिसत होते. ‘स्थानिक उमेदवार विरुद्ध बाहेरील उमेदवार’ असा प्रचारही रंगला होता.
मात्र आमदार कैलास पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्या प्रभावी नियोजनासोबतच प्रदीप घोणे यांचा दांडगा राजकीय अनुभव या सर्व घटकांमुळे अखेर विजयाचा झेंडा शिवसेनेने फडकावला. परिणामी सांजा गटात पुन्हा एकदा बाहेरच्या उमेदवारानेच बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
प्रदीप घोणे हे दरवेळी वेगवेगळ्या मतदारसंघांतून निवडणूक लढवून सातत्याने विजय मिळवणारे उमेदवार म्हणून ओळखले जात असून, यंदाही सांजा जिल्हा परिषद गटातून त्यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्या या विजयामुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने अव्वल स्थान पटकावले

Next Post

शहापूर जिल्हा परिषदसह गटातील येवती पंचायत समिती गणावर शिवसेनेचा भगवा फडकला..प्रियंका कुबेर मिटकरी प्रचंड बहुमताने विजयी

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

शहापूर जिल्हा परिषदसह गटातील येवती पंचायत समिती गणावर शिवसेनेचा भगवा फडकला..प्रियंका कुबेर मिटकरी प्रचंड बहुमताने विजयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!