• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शिवसेना उबाठा गटाला धाराशिवमध्ये दोन दिवसांत दुसरा मोठा हाबाडा उपतालुका प्रमुख गफूर शेख यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 16, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

शिवसेना उबाठा गटाला धाराशिवमध्ये दोन दिवसांत दुसरा मोठा हाबाडा उपतालुका प्रमुख गफूर शेख यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
धाराशिव, (प्रतिनिधी):शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाला धाराशिवमध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून उपतालुका प्रमुख तसेच सांजा गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य गफूरभाई शेख यांनी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील  यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे गफूर शेख यांनी यापूर्वी धाराशिव नगरपालिकेतील अनेक प्रभागांमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून काम केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसमोरच हा पक्षप्रवेश झाल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे सांजा जिल्हा परिषद गटातून विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील हे २०१६ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्याच मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी असलेल्या गफूर शेख यांनी शिवसेना उबाठा गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने उबाठा गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. यामुळे संबंधित सांजा गटामध्ये भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गफूर शेख पक्षांतर्गत नाराज असल्याचे समोर येत होते. त्यांनी ही नाराजी नेतृत्वाकडे व्यक्त केली होती व वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका होऊन ती दूर करण्याचे प्रयत्नही झाले होते. मात्र निवडणूक जाहीर होताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या पक्ष प्रवेशप्रसंगी  भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा नेते सतीश धननाईक, नितीन (बाप्पा) शेरखाने, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा धाराशिव शहराध्यक्ष फरमान काझी, सांजा गावचे माजी सरपंच श्रीराम बापू सूर्यवंशी, मालोजी सूर्यवंशी, आशिष नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दररोज शिवसेना उबाठा गटातून पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र असून, आता तरी उबाठा गटातील नेतृत्वाने आत्मपरीक्षण करून कार्यकर्त्यांना न्याय व ताकद देण्याचे काम करावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

आकाश कोकाटे यांच्याकडून स्वराज्य ध्वजस्तंभ व शिवजयंती तयारीची पाहणी

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज, ताकतीने लढण्याचा निर्धार- दत्ताभाऊ कुलकर्णी

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज, ताकतीने लढण्याचा निर्धार- दत्ताभाऊ कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!