• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 8, 2026
in महाराष्ट्र
0
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करा
0
SHARES
40
VIEWS

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

पिण्याच्या पाण्यासह गुरांसाठी पाणी व चाऱ्याचे नियोजन करण्यावर भरपाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

धाराशिव लोकविचार

यंदाचा पावसाळा हा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने व पावसात दीर्घ खंड पडल्याने शेतीसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठाही अपेक्षा पेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे शेतीबरोबरच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करण्यासोबत गुरांसाठी पाणी आणि चारा छावण्यासाठी आतापासून नियोजन करण्यात यावे,असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

आज ८ सप्टेंबर रोजी मुंबई येथील मंत्रालयातील दालनातून जिल्ह्यातील पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती आढावा दूरदृष्य प्रणालीद्वारे घेताना पालकमंत्री सरनाईक बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,धाराशिव पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता थोरात,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,कृषी विकास अधिकारी. पाटील,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता . कटकधोंड,जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,वरिष्ठ भूवैज्ञानिक.मांजरमकर यांची तर सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी,सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी,सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे, तालुकास्तरीय यंत्रणाचे अधिकारी व्ही.सी.द्वारे सहभागी होते.

पालकमंत्री सरनाईक म्हणाले की,आतापासूनच शेतकऱ्यांना आवाहन करून पाण्याची बचत करण्यास सांगावे. पाणीपुरवठ्यासाठी आतापासूनच निविदा प्रक्रियेची कामे करावी. तालुकास्तरावर सरपंच व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य घेऊन पाण्याबाबत जनजागृती करावी. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करावी.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे.शाळेतील स्वच्छतागृहासाठी पाण्याच्या वापरासाठी आवश्यक ठिकाणी टाक्या बसवाव्यात.ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात देखील यावेळी तीव्र ऊन राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात होणार नाही, याची शिक्षण विभागाने दक्षता घ्यावी.

आरोग्य केंद्र,उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचाराच्या पुरेशा सुविधा असतील याची दक्षता आतापासून घ्यावी,असे सरनाईक यावेळी म्हणाले.

जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी स्थितीची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा तब्बल ३४ दिवसांचा खंड पडला आहे. काही भागांत दुष्काळास कारणीभूत ठरणाऱ्या निकषांच्या पहिल्या टप्प्यातील स्थिती निर्माण झाली आहे.शासनाकडून पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्राप्त झाल्यास तत्काळ पंचनामे करता येतील,असे त्यांनी सांगितले.जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तालुकानिहाय समित्या गठित करण्यात आल्या आहेत.या समित्यांमध्ये प्रशासनातील अधिकारी,कृषी विद्यापीठ व आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ,तसेच पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. या समित्यांच्या माध्यमातून मंडळनिहाय पीक परिस्थितीची पाहणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील जलसाठ्यावरही स्पष्टपणे दिसत आहेत.यंदा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये केवळ आठ टक्के पाणीसाठा आहे.मागील वर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा २८ टक्के होता. त्यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्यासह शेती आणि पशुधनाच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी मांडताना.पुजार म्हणाले,ऑगस्ट महिन्यात सरासरी १५४.४ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ४३.१ मिलिमीटर पाऊस झाला.हे प्रमाण सरासरीच्या अवघे २७.९० टक्के आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये तब्बल ७२.१० टक्के पावसाची तूट निर्माण झाली.या मोठ्या तुटीचा खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला असून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे प्राथमिक संकेत दिसू लागले आहेत.सन २०२५ मध्ये जिल्ह्यात ९७३.१ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत सन २०२६ मध्ये ७ सप्टेंबरपर्यंत ३०५.३ मिलिमीटर पाऊस झाला असून तो सरासरीच्या ६८.९ टक्के आहे.

अवघ्या एका वर्षात पावसाच्या स्थितीत झालेला हा मोठा बदल शेतीसमोरील संकटाची तीव्रता अधोरेखित करीत असल्याचे श्री.पुजार यांनी सांगितले.सोयाबीनवर सर्वाधिक शेतकऱ्यांची भिस्तजिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख ६७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकूण पेरणी क्षेत्राच्या ८७ टक्के क्षेत्रावर सोयाबीन असून जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत. त्यामुळे पावसातील खंडाचा फटका सोयाबीनला बसल्यास त्याचा थेट परिणाम मोठ्या संख्येने शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणावर होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या तीव्र आणि दीर्घ खंडामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला.पावसाची तूट आणि पावसाचा दीर्घ खंड हे दोन्ही संकेत एकाचवेळी दिसत असल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत गंभीर प्राथमिक स्थिती निर्माण झाल्याचे.पुजार यांनी सांगितले.दरम्यान,धाराशिव पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता थोरात यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती दिली.

उपलब्ध पाण्याचा अनधिकृतपणे सिंचनासाठी उपसा होऊ नये,यासाठी भरारी पथके गठित करण्यात आली आहेत,असे त्यांनी सांगितले.बैठकीत संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनीही संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपाणी टंचाई
Previous Post

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र पुन्हा चर्चेत;

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र पुन्हा चर्चेत;

धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र पुन्हा चर्चेत;

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!