• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

२००० कोटींची गुंतवणूक आणि ३००० तरुणांना हक्काचा रोजगार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 24, 2026
in महाराष्ट्र
0
२००० कोटींची गुंतवणूक आणि ३००० तरुणांना हक्काचा रोजगार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
15
VIEWS

२००० कोटींची गुंतवणूक आणि ३००० तरुणांना हक्काचा रोजगार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

कौडगाव एमआयडीसीत मोठे ‘डिफेन्स हब’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विकासाला नवी गती!

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. केवळ शेतीवर अवलंबून असलेला आपला जिल्हा आता जागतिक स्तरावर ‘संरक्षण उत्पादन केंद्र’ (Defense Hub) म्हणून ओळखला जाईल. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर ‘ग्लोब फोर्ज लिमिटेड’ अर्थात पूर्वीची निबे लि. या नामांकित कंपनीने कौडगाव एमआयडीसीत पहिल्या टप्प्यात तब्बल अंदाजे २००० कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पामुळे जिल्हयातील ३००० पेक्षा अधिक तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

हा प्रकल्प केवळ कारखानदारीपुरता मर्यादित नसून तो शेती आणि तंत्रज्ञान यांचा संगम आहे. या ठिकाणी दोन प्रमुख प्रकल्प आकारास येणार आहेत. पहिल्या टप्प्यात कौडगाव एमआयडीसीतील १००० एकर जागेवर संरक्षण दलासाठी आवश्यक असलेले टीएनटी (TNT) आणि प्रपोलेंट तयार केले जातील. धाराशिवमध्ये ‘मिसाईल्स’ आणि संरक्षण साहित्य तयार करण्यासाठी मोठा प्रकल्प साकारत असलेल्या ग्लोब फोर्ज कडून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीही आनंदाची बातमी आहे. याच ठिकाणी नेपियर ग्रासवर आधारित सीबीजी (कॉम्प्रेसड बायोगॅस) प्लांट उभारला जाणार आहे. याला लागणारे गवत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून घेतले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे तसेच नैसर्गिक खत देखील उपलब्ध होणार आहे.यात तयार होणारा सीबीजी आणि खत जिल्ह्यातच देण्याबाबत कंपनी सोबत ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत कंपनीचे प्रमुख गणेशजी निबे यांच्याशी ८ एप्रिल २०२५ रोजी पहिली भेट झाली होती. त्यांनी १ हजार एकर जागेची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांना आपण आपल्या जिल्ह्यातील कौडगाव, होर्टी, माळुंब्रा, अपसिंगा अशा विविध जागा दाखवल्या होत्या. अखेर त्यांनी कौडगाव एमआयडीसी येथील जागेवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

या प्रकल्पासाठी कंपनी धाराशिव जिल्ह्यात अंदाजे ₹२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यामुळे सुमारे ३००० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.यात २००० केमिकल व मेकॅनिकल इंजिनियर आणि १००० इतर स्टाफ असे ३००० रोजगारनिर्मिती होणार आहे. याशिवाय स्थानिक MSME आणि पूरक उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगारही निर्माण होईल. या ठिकाणी संरक्षण दलासाठी आवश्यक असलेले टीएनटी (TNT) आणि प्रोपोलेंटचे उत्पादन केले जाईल. हा प्रकल्प धाराशिव जिल्ह्याला संरक्षण उत्पादनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. सुरक्षितता, पुरवठा साखळी आणि धोरणात्मक दृष्टीने कौडगाव औद्योगिक क्षेत्राची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्र शासनाने याला “इंटिग्रेटेड प्रोजेक्ट” म्हणून मान्यता दिली आहे.

भविष्यात ५००० एकरवर ‘डिफेन्स हब’

कौडगाव एमआयडीसीला लागूनच भविष्यात साधारण ५००० एकरवर संरक्षण क्षेत्राशी निगडित एक महाकाय ‘हब’ उभारण्याचे नियोजन आहे. ‘ग्लोब फोर्ज’ (नेबे इंडस्ट्रीज) यांनी त्यासाठी शब्द दिला आहे.२००४ साली आपण कौडगाव जवळ उपलब्ध असलेली १० हजार एकर पडीक जमिनीवर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचे ठरवले होते.त्यापैकी सुरुवातीला १५०० एकर संपादित केले आहे.आता ‘डिफेन्स हब’ साठी पडीक जमीन उपलब्ध करूम देण्यात येईल.
कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार ,उद्योगमंत्री उदय सामंत व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने धाराशिव आता प्रगतीच्या महामार्गावर आहे. भविष्यात देशाला संरक्षण साहित्य पुरवणारा जिल्हा म्हणून धाराशिव जिल्ह्याचा नावलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही. धाराशिवच्या औद्योगिक विकासाचा हा ‘श्रीगणेशा’ असून, येणारा काळ आपल्या जिल्ह्यासाठी समृद्धीचा आणि प्रगतीचा राहणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले यावेळी नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नेताजी पाटील यांची उपस्थिती होती.

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव विकासरोजगार मेळावा
Previous Post

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता शिवसेना (उ.बा.ठा.) स्टाईलने तारेचे कुंपन उखडून टाकुन पुर्ववत खुला

Next Post

लोकविचार’च्या पाठपुराव्याला यश बसस्थानकातील दयनीय परिस्थितीला अखेर दिलासा….

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
लोकविचार’च्या पाठपुराव्याला यश बसस्थानकातील दयनीय परिस्थितीला अखेर दिलासा….

लोकविचार’च्या पाठपुराव्याला यश बसस्थानकातील दयनीय परिस्थितीला अखेर दिलासा....

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!