• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

लोकविचार’च्या पाठपुराव्याला यश बसस्थानकातील दयनीय परिस्थितीला अखेर दिलासा….

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 24, 2026
in महाराष्ट्र
0
लोकविचार’च्या पाठपुराव्याला यश बसस्थानकातील दयनीय परिस्थितीला अखेर दिलासा….
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकविचार’च्या पाठपुराव्याला यश बसस्थानकातील दयनीय परिस्थितीला अखेर दिलासा….

 अकाउंट सेक्शनचे नव्या इमारतीत स्थलांतर अंतिम टप्प्यात विभाग नियंत्रक अजय पाटील

धाराशिव | लोकविचार

शहरातील बसस्थानकाच्या मागील जीर्ण व पडीक इमारतीतून सुरू असलेल्या अकाउंट (कॅशियर) विभागाच्या दयनीय परिस्थितीला अखेर दिलासा मिळणार आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ‘लोकविचार’ने सातत्याने या प्रश्नावर प्रकाश टाकत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून आता संबंधित विभागाचे नव्या, सुसज्ज बसस्थानकाच्या इमारतीत स्थलांतर करण्याचा मार्ग अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

सध्या अकाउंट विभाग ज्या ठिकाणाहून कार्यरत आहे, त्या इमारतीची अवस्था अत्यंत खराब आहे. परिसरात झाडे-झुडपे, गवत, दुर्गंधी यांचा त्रास असून डुकरे, कुत्री, जनावरे तसेच सापांचा वावर असल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात गटाराचे पाणी वाहत असल्याने महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना पाण्यातूनच ये-जा करत तिकीट मशिन व रोख रक्कम जमा करावी लागत होती. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत होती.

दरम्यान, नवीन बसस्थानकात पुरेशी जागा उपलब्ध असतानाही अकाउंट विभाग तिकडे स्थलांतरित करण्यास विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत होता. ‘लोकविचार’ने या मुद्द्यावर सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्याने अखेर प्रशासनाला जाग आली.

याच पार्श्वभूमीवर तत्कालीन विभाग नियंत्रकांच्या हलगर्जीपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय सहन करण्याची वेळ आली होती. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी या गंभीर प्रश्नाकडे वैयक्तिक लक्ष घातले.  त्यांनी धाराशिव आगारातील परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ कारवाई केली. कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय व विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून अकाउंट / क्याशियर सेक्शन स्थलांतरित करण्यासाठी तातडीने निविदा काढून कामाला प्राधान्य दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, अकाउंट सेक्शनचे नव्या बसस्थानकाच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर स्थलांतर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या सुमारे ९५ ते ९८ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित लाईट फिटिंग व इलेक्ट्रिकचे काम सुरू आहे. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण होऊन येत्या आठवडाभरात अकाउंट सेक्शनचे पूर्णतः स्थलांतर होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी ‘लोकविचार’शी बोलताना दिली. येत्या १ मे ‘कामगार दिना’पूर्वीच हे स्थलांतर पूर्ण होणार असल्याचे संकेत आहेत.

या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून ‘लोकविचार’ने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल तसेच प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल कर्मचारी वर्गातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. “दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्येला न्याय मिळाला,” अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

एकूणच, पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

लोकविचार – “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक: अमजद सय्यद | 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

२००० कोटींची गुंतवणूक आणि ३००० तरुणांना हक्काचा रोजगार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Recent Posts

  • लोकविचार’च्या पाठपुराव्याला यश बसस्थानकातील दयनीय परिस्थितीला अखेर दिलासा….
  • २००० कोटींची गुंतवणूक आणि ३००० तरुणांना हक्काचा रोजगार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
  • पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता शिवसेना (उ.बा.ठा.) स्टाईलने तारेचे कुंपन उखडून टाकुन पुर्ववत खुला
  • धाराशिवच्या पाणी प्रश्नांवर योग्य नियोजनाला वेग!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांना बळ
  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह तात्काळ दुरुस्त करानाट्य परिषदेला स्वतंत्र सभागृह द्याउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाट्य परिषदेची मागणी

Recent Comments

  1. Lisa on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Gunner SEO on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Darrell Camarillo on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Hassan Clint on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Brittany Joslyn on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.