• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश! पोलिस अधीक्षक रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 1, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

अंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश! पोलिस अधीक्षक रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यश
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा पोलिसांच्या दक्ष आणि प्रभावी कारवाईमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने राष्ट्रीय महामार्गावर जॅक टाकून प्रवाश्यांच्या गाड्या अडवून दरोडा टाकणाऱ्या अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे.
मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्री महामार्गावर वाहन थांबवून प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या. याच काळात दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी उमरग्याकडून सोलापूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका डॉक्टर परिवाराला लक्ष्य बनवून दरोडा टाकण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती.
या गंभीर प्रकरणाचा तपास धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांच्या पथकाला देण्यात आला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून आणि पारंपरिक तपास पद्धतींचा आधार घेत या प्रकरणाचा अचूक मागोवा घेतला. अखेर अथक प्रयत्नांनंतर या टोळीतील दोन आरोपी अर्जुन बालाजी शिंदे व आशोक हिरामन शिंदे यांना अटक करण्यात आली.
चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर चार साथीदारांसह मुरूम परिसरात तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथेही अशाच प्रकारचे दरोडे टाकल्याचे उघड केले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली XUV500 गाडी, जॅक आणि ट्रक जप्त केले आहेत.
या उत्कृष्ट कामगिरीत सुदर्शन कासार (स.पो.नि.), शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, शोभा बांगर, फरहान पठाण, राठोड, सुभाष चौरे, प्रकाश बोईनवाड, रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव तसेच QRT आणि RCP पथकातील सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या कारवाईबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक रीतु खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे मनःपूर्वक कौतुक केले असून, “गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी धाराशिव पोलिस कटिबद्ध असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल,” असे त्यांनी नमूद केले.
या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे धाराशिव पोलिस दलाचा आत्मविश्वास आणखी वाढला असून, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास दृढ झाला आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: crimedharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsdharashiv policepolice stationआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलखासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपोलिस अधीक्षकरितू खोखरस्थानिक गुन्हे शाखा धाराशिव
Previous Post

धाराशिव शहरातील सिग्नल पुन्हा ‘दुरुस्ती’च्या नावाखाली खर्चाचा खेळ? “दर काही महिन्यांनी निविदा, पण सिग्नल मात्र कायम बंद!”

Next Post

माणुसकी, सेवा आणि समर्पण यांचं प्रतीक — कोरोना काळात मानवतेचा दीप पेटवणारा धाडसी युवक प्रशांत बापू साळुंके नगरपालिकेतून जनसेवेसाठी सज्ज

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

माणुसकी, सेवा आणि समर्पण यांचं प्रतीक — कोरोना काळात मानवतेचा दीप पेटवणारा धाडसी युवक प्रशांत बापू साळुंके नगरपालिकेतून जनसेवेसाठी सज्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!