• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तोतया पोलीस अखेर गजाआड!; धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, आता ‘शासकीय कामात अडथळा’चा गुन्हा दाखल होणार का?

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 2, 2026
in क्राईम
0
तोतया पोलीस अखेर गजाआड!; धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, आता ‘शासकीय कामात अडथळा’चा गुन्हा दाखल होणार का?
0
SHARES
982
VIEWS

तोतया पोलीस अखेर गजाआड!; धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, आता ‘शासकीय कामात अडथळा’चा गुन्हा दाखल होणार का?

धाराशिव | लोकविचार

जिल्हा होमगार्ड कार्यालयात घुसून महिला होमगार्ड (कर्मचाऱ्यांना) दमदाटी, शिवीगाळ करत शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेला कथित तोतया पोलीस राम बोंदर अखेर धाराशिव शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत फरार राहिलेल्या या आरोपीला अत्याधुनिक तांत्रिक तपास, लोकेशन ट्रॅकिंग आणि विशेष पथकाच्या नियोजनबद्ध कारवाईत अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून, धाराशिव पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

या कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि विभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी विशेष पथक तयार करून सातत्याने आरोपीचा माग काढला. आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने आणि प्रत्येक वेळी पोलिसांना चकवा देत असल्याने त्याला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते. मात्र तांत्रिक विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग आणि गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकाने अखेर आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले.

विशेष म्हणजे, १९ जून रोजी ‘लोकविचार’ने “तोतया पोलिसाला अभय कुणाचे? शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा का नाही; होमगार्ड प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!” या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून या प्रकरणातील गंभीर बाबी पुढे आणल्या होत्या. शासकीय कार्यालयात घुसून सुरू असलेल्या अधिकृत कामकाजात हस्तक्षेप, महिला कर्मचाऱ्यांना धमकावणे, अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून अधिकार गाजवण्याचा प्रयत्न आणि प्रशासनावर दबाव आणल्याच्या आरोपांची दखल घेत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवत अखेर बोंदर ला अटक करण्यात यश आले.

मात्र आरोपीला अटक झाल्यानंतरही एक महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. जिल्हा होमगार्ड कार्यालयात घडलेल्या प्रकारात शासकीय कामकाजात प्रत्यक्ष अडथळा निर्माण झाल्याचा आरोप असताना, भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासंदर्भातील तरतुदींनुसार स्वतंत्र गुन्हा दाखल होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

तपास यंत्रणेकडून आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), संपर्क, लोकेशन हिस्ट्री आणि डिजिटल पुरावे तपासले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तपासातून आरोपीचे नेमके संबंध कोणाशी होते, तो शासकीय कार्यालयात इतक्या सहजतेने कसा वावरत होता, त्याला कुणाचे संरक्षण होते का आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का, यासारख्या अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि सर्वसमावेशक व्हावा, आरोपीच्या मोबाईलसह सर्व डिजिटल पुराव्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यात यावे आणि आवश्यक असल्यास संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तोतया पोलीस अखेर गजाआड गेल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी, शासकीय कामात अडथळा, शासकीय कार्यालयातील अनधिकृत हस्तक्षेप आणि संभाव्य संगनमताच्या आरोपांबाबत पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकविचार | सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद
मो. 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectorosmanabadउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

Next Post

धाराशिव बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांच्या मदतीला ! कॅमेरे असून अडचण नसून खोळंबा !

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post
धाराशिव बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांच्या मदतीला ! कॅमेरे असून अडचण नसून खोळंबा !

धाराशिव बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांच्या मदतीला ! कॅमेरे असून अडचण नसून खोळंबा !

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!