• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अमृत 2.0 मुळे नळदुर्गचा पाणीप्रश्न मार्गी भवानीनगर-रहिमनगरात विकासकामांचा वेग!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 15, 2026
in Uncategorized
0
अमृत 2.0 मुळे नळदुर्गचा पाणीप्रश्न मार्गी भवानीनगर-रहिमनगरात विकासकामांचा वेग!
0
SHARES
229
VIEWS

अमृत 2.0 मुळे नळदुर्गचा पाणीप्रश्न मार्गी भवानीनगर-रहिमनगरात विकासकामांचा वेग!

आमदार रानाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून शहरात पाणीपुरवठा योजनेचा अंतिम टप्पा नगरपालिकेचे सूक्ष्म नियोजन, नागरिकांमध्ये समाधान

नळदुर्ग | प्रतिनिधी (अझहर शेख) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहरात सध्या विकासकामांचा झपाट्याने वेग वाढलेला असून, केंद्र सरकारच्या ‘अमृत योजना 2.0’ अंतर्गत पाणीपुरवठा व नागरी सुविधांच्या कामांनी अंतिम टप्पा गाठला आहे. भवानीनगर, रहिमनगर, बी.के. हॉल परिसर आणि राणे प्लॉटिंग भागात सुरू असलेल्या या कामांमुळे शहराचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणीप्रश्न आता कायमस्वरूपी निकाली निघण्याची चिन्हे दिसत आहेत.नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रानाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत अमृत योजनेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आधुनिक व शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याचा या योजनेतून प्रयत्न केला जात आहे. यामुळे केवळ नियमित पाणीपुरवठाच नव्हे, तर भविष्यातील गरजाही पूर्ण होणार आहेत.दरम्यान, नळदुर्ग नगरपालिकेचे नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांच्या नेतृत्वाखाली या योजनेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. शहराच्या विस्तारणाऱ्या भागांमध्ये मूलभूत सुविधा पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. बांधकाम सभापती पांडू तात्या पुदाले हे स्वतः कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून कामाची पाहणी करत असून, दर्जेदार कामासाठी प्रशासनाला सतत सूचना देत आहेत.सध्या भवानीनगर व रहिमनगर भागात मोठ्या प्रमाणावर खोदकाम, पाईपलाईन टाकणे व नवीन पाणी टाकीशी जोडणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या कामांमुळे प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने होत आहे.अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना दिलासादायक ठरत आहे. परिसरातील नागरिकांनी या विकासकामांचे स्वागत केले असून, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.“शहरातील प्रत्येक भागाला मूलभूत सुविधा मिळाल्याशिवाय विकास पूर्ण होणार नाही. अमृत 2.0 योजनेमुळे भवानीनगर आणि रहिमनगरच्या विकासाला नवी दिशा मिळेल,” असे मत नगरपालिका प्रशासनाने व्यक्त केले आहे.एकूणच, नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे नळदुर्ग शहराचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर असून, येत्या काळात शहराचा कायापालट होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

सर्वसामान्य लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादखासदार ओमराजे निंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषदनगरपरिषदनळदुर्गविकासकाम
Previous Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने एसटीचे योग्य नियोजन आले कामी यात्राकाळात ६२ लाख ६६ हजारांची घसघशीत कमाई

Next Post

आरटीओ कार्यालय ‘तात्पुरती पदोन्नती’ संपली कार्यालयीन अधिक्षक नरसिंह कुलकर्णी यांची डिमोशनसह लातूर येथे वरिष्ठ लिपीक पदावर पुनर्बदली?

Related Posts

१५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
Uncategorized

१५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!

August 10, 2026
Uncategorized

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; दोघांची प्रकृती गंभीर

July 29, 2026
आरक्षणाला हात लावाल तर सरकारला रस्त्यावर उत्तर देऊ – आनंदराज आंबेडकर भर पावसात कडाडले
Uncategorized

आरक्षणाला हात लावाल तर सरकारला रस्त्यावर उत्तर देऊ – आनंदराज आंबेडकर भर पावसात कडाडले

July 28, 2026
Uncategorized

येडशीतील युवक शेतकरी दगडू देशमुख यांचा भरदिवसा खून; येडशी–सोनेगाव रस्त्यावर मृतदेह आढळला, डॉग स्कॉड व फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

July 13, 2026
विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन
Uncategorized

विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन

June 20, 2026
आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!
Uncategorized

आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!

May 14, 2026
Next Post
आरटीओ कार्यालय ‘तात्पुरती पदोन्नती’ संपली कार्यालयीन अधिक्षक नरसिंह कुलकर्णी यांची डिमोशनसह लातूर येथे वरिष्ठ लिपीक पदावर पुनर्बदली?

आरटीओ कार्यालय ‘तात्पुरती पदोन्नती’ संपली कार्यालयीन अधिक्षक नरसिंह कुलकर्णी यांची डिमोशनसह लातूर येथे वरिष्ठ लिपीक पदावर पुनर्बदली?

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!