• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील विजयी;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 29, 2026
in महाराष्ट्र
0
पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील विजयी;
0
SHARES
137
VIEWS

पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय; महायुतीच्या सतीश चव्हाण यांचा १८ हजार १२४ मतांनी पराभव

८५ हजार ८७६ मतांचा कौल; ४५ तासांहून अधिक काळ चाललेल्या मतमोजणीनंतर विजयावर शिक्कामोर्तब

छत्रपती संभाजीनगर | लोकविचार

विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी १८ हजार १२४ मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांचा पराभव केला. डॉ. पाटील यांना एकूण ८५ हजार ८७६ मते, तर चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. तब्बल ४५ तासांहून अधिक काळ चाललेल्या मतमोजणीनंतर गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी डॉ. पाटील यांना विजयी घोषित करून प्रमाणपत्र प्रदान केले.

या निकालामुळे पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आठ जिल्ह्यांतील पदवीधर मतदारांनी दिलेला कौल या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला. डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडेही लक्ष लागले आहे.

पहिल्या पसंतीत आघाडी, मतहस्तांतरणानंतर विजय

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण ४१ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीसाठी ७० टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती.

पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ७३ हजार ९३१, तर सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८ मते मिळाली. अपक्ष उमेदवार रविराज उर्फ अण्णासाहेब साबळे-पाटील यांना १९ हजार ८३५, तर दिलीप घुगे यांना ८ हजार ४३९ मते मिळाली. मात्र, विजयासाठी आवश्यक असलेला ८८ हजार ५५८ मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराला गाठता आला नाही.

त्यामुळे निवडणूक नियमांनुसार कमी मते मिळालेल्या उमेदवारांना टप्प्याटप्प्याने वगळून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरण करण्यात आले. एकूण ४१ उमेदवारांपैकी ३९ उमेदवार वगळल्यानंतर डॉ. पाटील आणि सतीश चव्हाण हे दोन उमेदवार अंतिम टप्प्यात राहिले. मतहस्तांतरणाच्या प्रक्रियेनंतर डॉ. पाटील यांना ८५ हजार ८७६, तर चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. अखेर १८ हजार १२४ मतांच्या फरकाने डॉ. पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून मतमोजणी पूर्ण

मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी पहाटे अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत सुरू होती. मतपत्रिकांची पडताळणी, वर्गीकरण, पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी, उमेदवारांची वगळणी, मतहस्तांतरण आणि अंतिम आकडेवारीची तपासणी अशा विविध टप्प्यांतून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत आणि निवडणूक निरीक्षक माधवी खोडे-चवरे यांच्या देखरेखीखाली मतमोजणी झाली. संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामुळे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात नवे राजकीय पर्व सुरू झाले आहे. पदवीधर मतदारांनी दिलेल्या कौलानंतर आता या विश्वासाला त्यांच्या आगामी कामकाजातून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे मतदारांचे लक्ष राहणार आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपदवीधर मतदारसंघविधानपरिषद
Previous Post

दुचाकी वाहनांसाठी MH25BM सिरीज सुरु

Next Post

विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Related Posts

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;
महाराष्ट्र

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा
महाराष्ट्र

दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा

November 17, 2026
एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!
महाराष्ट्र

एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!

November 16, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

November 16, 2026
तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा
महाराष्ट्र

तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा

November 16, 2026
अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस
महाराष्ट्र

अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस

November 16, 2026
Next Post
विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

ताज्या घडामोडी

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

November 20, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!