दुचाकी वाहनांसाठी MH25BM या सुरु होणाऱ्या मालिकेसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकसाठी अर्ज करावेत – हर्षल डाके
धाराशिव लोकविचार
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी MH25BM ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी अर्ज स्वीकारण्यात येणार असून दुचाकी वाहनधारकांनी आपले अर्ज या कार्यालयास सादर करावेत असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे.
वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण उडून बऱ्याच नागरीकांनाही याचा त्रास होतो. नागरीकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या वाहनमालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत.
अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५ अ मध्ये विहित केलेल्या पत्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. (उदा. आधार कार्ड, लाईट बील, टेलीफोन बील) तसेच आकर्षक क्रमांकासाठी देय असलेल्या विहित शुल्काच्या डी.डी. अर्जासह जमा करणे बंधनकारक आहे.
तो डीडी फक्त Deputy Regional Transport Officer, Dharashiv यांच्या नांवे केवळ राष्ट्रीयकृत (Nationalize) बँकेचा असावा. या व्यतीरिक्त इतर नावाचे डी.डी. बाद ठरवले जातील. तसेच डीडी व्यतिरिक्त बँकेने जारी केलेले बँकर्स चेक स्विकारले जाणार नाहीत. तो डीडी कमीत-कमी एक महिना मुदतीमधील असावा. तसेचएकाच नंबरसाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जर अतिरिक्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शविलेल्या दिवशी सीलबंद लिफाफयात कार्यालयात जमा करावा.
लिलावासाठी सादर केलेला अतिरिक्त रक्कमेचा डीडी ३०० रुपयांपेक्षा कमी नसावा. तो डीडी फक्त Deputy Regional Transport Officer, Dharashiv याच्या नांवे केवळ राष्ट्रीयकृत (Nationalize) बँकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील.
डीडी कमीत-कमी एक महिना मुदतीमधील असावा. अतिरिक्त रक्कमेचे संबंधीत अर्जदारांकडून प्राप्त झालेले डीडीचे लिफाफेअर्जदार किंवा प्रतिनिधी यांच्या समक्ष व धाराशिव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत उघडले जातील. ज्या अर्जदाराने अधिक रक्कमेचा डीडी सादर केला असेल त्यास सदरचा पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. विशेष म्हणजे एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही.
नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करुन वाहन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. अन्यथा राखून ठेवलेल्या नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी शासन जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही, अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.
याबरोबरच आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीचे प्राधिकारपत्र याचा नमुना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहे.नवीन दुचाकी संवर्गातील वाहनांसाठी MH25BM मालिका सुरु करण्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे – आकर्षक क्रमांक पसंती क्रमांक कांचे व डी.डी. दि. २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. तर एका क्रमांकाचे दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झालेल्या अर्जदारांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तसेच एकाच क्रमांकाचे दोन किंवा अधिक प्राप्त झालेल्या अर्जांसाठी अर्जदार किंवा प्रतिनिधी यांच्याकडून बंद लिफाफ्यात डी.डी. स्वीकारणे व त्यांच्या समक्ष उघडून आकर्षक क्रमांकासाठी दि.२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती हर्षल डाके यांनी दिली आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786










