• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

ठाकरे नगर नवरात्र महोत्सवात आज देवीच्या छबिना मिरवणुकीसह अघोरी कलाकारांचा भव्य रोड शो!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 25, 2026
in महाराष्ट्र
0
ठाकरे नगर नवरात्र महोत्सवात आज देवीच्या छबिना मिरवणुकीसह अघोरी कलाकारांचा भव्य रोड शो!
0
SHARES
0
VIEWS

ठाकरे नगर नवरात्र महोत्सवात आज देवीच्या छबिना मिरवणुकीसह अघोरी कलाकारांचा भव्य रोड शो!

महाप्रसाद अन्नदानाचे २६ वे वर्ष; ‘खेळ पैठणीचा’, बालस्पर्धांचे बक्षीस वितरण आणि महावस्त्रदान उपक्रमाचे आयोजन

धाराशिव लोकविचार

धाराशिव शहरातील ठाकरे नगर नवरात्र महोत्सवाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता देवीच्या छबिना मिरवणुकीला सुरुवात होणार असून, नागालँड येथून आलेल्या अघोरी कलाकारांचा भव्य रोड शो आणि दिव्य कलाकृतींचे विशेष सादरीकरण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.ठाकरे नगर नवरात्र महोत्सवाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून महाप्रसाद अन्नदानाचा उपक्रम अविरतपणे राबविण्यात येत आहे. यंदा या उपक्रमाचे २६ वे वर्ष असून, धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत महोत्सवाच्या माध्यमातून महावस्त्रदानाचाही उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात आला आहे.

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या छबिना मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून, या मिरवणुकीत नागालँड येथून आलेल्या अघोरी कलाकारांचा भव्य रोड शो सादर केला जाणार आहे. विविध दिव्य कलाकृती आणि विशेष सादरीकरणामुळे या मिरवणुकीत आकर्षकता निर्माण होणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.दरम्यान, महोत्सवाच्या वतीने महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात आकर्षक पैठणीसह विविध बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तसेच लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही करण्यात येणार आहे.धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक उपक्रम, अन्नदान, महावस्त्रदान, महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि बालकांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांच्या माध्यमातून ठाकरे नगर नवरात्र महोत्सवाने सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

या भव्य मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी धाराशिव शहरातील नागरिक, महिला, युवक आणि बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाकरे नगर नवरात्र महोत्सवाच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका!

Related Posts

शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका!
कृषी

शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका!

October 25, 2026
एसटीच्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
महाराष्ट्र

एसटीच्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

October 22, 2026
धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा
महाराष्ट्र

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026

ताज्या घडामोडी

ठाकरे नगर नवरात्र महोत्सवात आज देवीच्या छबिना मिरवणुकीसह अघोरी कलाकारांचा भव्य रोड शो!

ठाकरे नगर नवरात्र महोत्सवात आज देवीच्या छबिना मिरवणुकीसह अघोरी कलाकारांचा भव्य रोड शो!

October 25, 2026
शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका!

शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका!

October 25, 2026
नगर परिषदेची कचरा संकलन निविदा रद्द करा;

नगर परिषदेची कचरा संकलन निविदा रद्द करा;

October 22, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!