• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जिल्ह्यात १०,००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी स्वीकारली सामाजिक जबाबदारी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 7, 2026
in महाराष्ट्र
0
जिल्ह्यात १०,००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी स्वीकारली सामाजिक जबाबदारी
0
SHARES
16
VIEWS

जिल्ह्यात १०,००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी स्वीकारली सामाजिक जबाबदारी

‘सीएसआर’ कृती आराखडा तयार करण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्देश

धाराशिव: धाराशिव जिल्ह्याची ओळख आता केवळ दुष्काळी जिल्हा म्हणून न राहता ‘ऊर्जा हब’ म्हणून विकसित होत आहे. जिल्ह्यात सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे १० हजार कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक होत असताना, या कंपन्यांनी आता केवळ नफा न कमवता जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात वाटा उचलणे अनिवार्य आहे. कंपन्यांचा ‘सीएसआर’ निधी आता केवळ कांही आरोग्य शिबिर व तत्सम बाबीपुरता मर्यादित न ठेवता, जिल्ह्याच्या मूलभूत सुविधांसाठी वापरला जावा, असे निर्देश आपण दिले होते त्यानुसार जिल्ह्यात १०,००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारली असून आता तातडीने ‘सीएसआर’ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले आहेत.

मुंबई येथील ‘मित्र’च्या कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि विविध ऊर्जा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आतापर्यंत पवन आणि सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी त्यांचा सीएसआर निधी किरकोळ बाबींवर खर्च केला आहे, मात्र यापुढे हा निधी ठोस कामांसाठी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुन्या केटी वेअरची अर्थात कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, शाळा आणि रुग्णालयांच्या इमारतींचे बळकटीकरण व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिक तरुणांना प्रशिक्षणातून रोजगार मिळवून देणे, प्रकल्पांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण कंपन्यांनी स्वतःच्या खर्चाने करण्याबाबत व त्यासाठी प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. पवनचक्की किंवा सौर प्रकल्पांसाठी जमीन खरेदी-विक्री करताना एजंटांकडून शेतकऱ्यांवर दबाव टाकून त्यांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यापुढे कंपन्यांनी कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांशी संवाद साधावा. जमिनीला प्रचलित बाजारभावाप्रमाणे योग्य आणि समान दर मिळावा, यासाठी प्रशासनाने दरनिश्चितीचे धोरण ठरवावे, अशी कडक भूमिका घेत आमदार पाटील यांनी तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकल्पांच्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक ‘प्रमाणित कार्यपद्धती’ तयार केली जाईल. तसेच, कंपन्यांच्या सीएसआर निधीचा वापर पारदर्शकपणे व्हावा, यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून कामांचा प्राधान्यक्रम ठरवला जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

धाराशिव जिल्हा देशाच्या ऊर्जा नकाशावर : आमदार राणाजगजितसिंह पाटील

जिल्ह्यात मोठी गुंतवणूक येत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, ज्यांच्या जमिनीवर हे प्रकल्प उभे आहेत, त्या शेतकरी बांधवांवर अन्याय होता कामा नये. कृषी, उद्योग आणि पर्यटन या त्रिवेणी संगमातून धाराशिवच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळत आहे. हरित ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यात ३००० कोटींची गुंतवणूक यापूर्वीच झाली आहे. उर्वरित ७००० कोटींचे प्रकल्प मार्गी लागत आहेत. या गुंतवणुकीमुळे धाराशिव जिल्हा केवळ राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या ऊर्जा नकाशावर ठळकपणे उमटणार आहे. प्रशासकीय स्तरावर या सगळ्या कामांचा दर १५ दिवसांनी आढावा घेण्याची सूचना जिल्हाधिकारी यांना केली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादतुळजापूर विधानसभाधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; आ. प्रवीण स्वामी यांचा इशारा, धनंजय शिंगाडे आक्रमक भूमिकेत

Next Post

सीएनजी तुटवड्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा !अपघाताचा धोका वाढला अन् प्रशासनाचे दुर्लक्ष

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
सीएनजी तुटवड्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा !अपघाताचा धोका वाढला अन् प्रशासनाचे दुर्लक्ष

सीएनजी तुटवड्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा !अपघाताचा धोका वाढला अन् प्रशासनाचे दुर्लक्ष

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!