• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

परंडा तालुक्यात माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकणारी सात जणांची टोळी २४ तासांत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 26, 2026
in क्राईम
0
परंडा तालुक्यात माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकणारी सात जणांची टोळी २४ तासांत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
0
SHARES
47
VIEWS

परंडा तालुक्यात माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकणारी सात जणांची टोळी २४ तासांत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई,

धाराशिव | लोकविचार

परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे माजी सैनिकाच्या घरावर झालेल्या सशस्त्र दरोड्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत सात जणांच्या कुख्यात टोळीला अटक केली आहे. पोलिसांच्या या धाडसी आणि वेगवान कारवाईमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली आणि अन्य साहित्य असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.२५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभेज येथील कॅनॉलजवळील शेतवस्तीत माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप हे पत्नीसमवेत घरासमोरील बाजेवर झोपले असताना सात जणांच्या सशस्त्र टोळीने त्यांच्या घरावर हल्ला चढवला. आरोपींनी विश्वनाथ जगताप यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले, तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. रात्रीचा अंधार, सीसीटीव्ही सुविधेचा अभाव आणि आरोपींचा कोणताही ठोस मागमूस नसल्यामुळे तपास आव्हानात्मक ठरत होता. मात्र पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि स्थानिक नेटवर्कच्या साहाय्याने आरोपींचा माग काढला.तपासादरम्यान आरोपी डोकेवाडी शिवारात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून परिसराला वेढा घातला. काही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून सातही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये किरण पंडित शिंदे, राघवा निवांत्या शिंदे, ज्ञानेश्वर लिंग्या काळे, विकास नागेश भोसले, सुनील प्रकाश भोसले, चेतन किरण शिंदे आणि सुनील चरण शिंदे यांचा समावेश आहे.चौकशीत आरोपींनी दोन मोटारसायकलींवरून कुंभेज येथे जाऊन दरोडा टाकल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली तसेच अन्य साहित्य जप्त केले. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, परंडा पोलिस निरीक्षक पोनि आसाराम चोरमले, सपोनि सचिन खटके, सपोनि अमोल मोरे, सपोनि सुर्वे, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, वसीम शेख, अमोल चव्हाण, शौकत पठाण, दयानंद गाडेकर, गंगाधर, सपोनि मुळे, पोलीस नाईक ववन जाधवर, चापोहे महादेव अरब, रोहित दंडनाईक, विनायक दहिहंडे तसेच आरसीपी पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्पर, धाडसी आणि परिणामकारक कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा वेगाने उलगडा झाला असून धाराशिव जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांना कायद्याचा कठोर संदेश दिला आहे. परंडा तालुक्यातील या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून पोलिस दलाच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

कॉपर वायर चोरी प्रकरण उघडकीस 3.70 लाखांच्या मुद्देमालासह मुख्य आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

Next Post

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक; अंतर्गत गटबाजी विसरून शिवसेना संघटन अधिक मजबूत करा – आ.तानाजीराव सावंत

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक; अंतर्गत गटबाजी विसरून शिवसेना संघटन अधिक मजबूत करा – आ.तानाजीराव सावंत

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक; अंतर्गत गटबाजी विसरून शिवसेना संघटन अधिक मजबूत करा - आ.तानाजीराव सावंत

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!