• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कॉपर वायर चोरी प्रकरण उघडकीस 3.70 लाखांच्या मुद्देमालासह मुख्य आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 25, 2026
in क्राईम
0
कॉपर वायर चोरी प्रकरण उघडकीस 3.70 लाखांच्या मुद्देमालासह मुख्य आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई
0
SHARES
72
VIEWS

कॉपर वायर चोरी प्रकरण उघडकीस 3.70 लाखांच्या मुद्देमालासह मुख्य आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

धाराशिव | लोकविचार 

शहर व ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सक्रिय असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक महत्त्वाची कामगिरी बजावत दुकानातील कॉपर वायर चोरी प्रकरण उघडकीस आणले आहे. या कारवाईत मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन सुमारे ₹3 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. 23 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व त्यांच्या पथकाने मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पेट्रोलिंगदरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, शिराढोण पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील आरोपी धनाजी बाबुराव पवार (रा. आळणी फाटा, ता. जि. धाराशिव) हा चोरीचा माल विक्रीसाठी वाशी फाटा येथे थांबलेला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ सापळा रचून धनाजी पवार यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने साथीदार शिवाजी सर्जेराव काळे (रा. अंदोरा, ता. कळंब) याच्यासह शिराढोण येथील दुकानातून 200 ते 250 किलो कॉपर वायर चोरी केल्याची कबुली दिली. ही चोरी टाटा सुमो (क्रमांक MH 14 CX 2377) वाहनाच्या साहाय्याने करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले.

पोलीसांनी आरोपीकडून 17 किलो कॉपर वायर व संबंधित टाटा सुमो वाहन असा एकूण ₹3,70,400 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित चोरीच्या मालाचा शोध सुरू असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोह अमोल चव्हाण, बळीराम शिंदे, अमोल निंबाळकर, राहुल नाईकवाडी, महिला पोलीस शोभा बांगर तसेच चालक विनायक दहिहंडे यांचा समावेश होता.

या यशस्वी कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक होत असून चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

आरटीओ-दलाल साठगाठीतून वाहन हडप? बनावट कागदपत्रे, बेकायदेशीर नोंदणी; तक्रारदाराचा संताप — “न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन

Next Post

परंडा तालुक्यात माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकणारी सात जणांची टोळी २४ तासांत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
परंडा तालुक्यात माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकणारी सात जणांची टोळी २४ तासांत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

परंडा तालुक्यात माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकणारी सात जणांची टोळी २४ तासांत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!